कोल्हापूर

वठार तर्फे वडगावला उद्या जंगी कुस्ती मैदान

CD

माऊली जमदाडे विरुद्ध रविकुमार - 08037
कुमार पाटील विरुद्ध प्रदीप ठाकूर - 08035

वठार तर्फ वडगावला
उद्या जंगी कुस्ती मैदान
रविकुमार, जमदाडे यांच्यात मुख्य लढत

सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. १० : हातकणंगले तालुक्यातील वठार तर्फ वडगाव येथील उरुसानिमित्त रविवारी (ता. १२) आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी दिल्लीच्या रविकुमार व कोल्हापूरच्या माऊली जमदाडे यांच्यात लढत होईल. चांदीची गदा व एक लाख, ११ हजार १११ रुपयांची इनामी कुस्ती आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचा कुमार पाटील विरुद्ध प्रदीप ठाकूर (सांगली), तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती वारणेचा नामदेव केसरे विरुद्ध पुण्याच्या अभिजित बनसोडे यांच्यात होईल. विजेत्यांना अनुक्रमे ७७ हजार ७७७ व ३३ हजार ३३३ रुपये, तसेच चांदीची गदा मिळेल.
वठार तर्फ वडगाव येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत दावल मलिक बाबांच्या मुख्य उरुसास शनिवारी (ता. ११) प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त रविवारी दुपारी चारला पाण्याच्या टाकी शेजारील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मैदान होईल. मैदानात चौथ्या क्रमांकाची कुस्ती मोहोळचे उदय खांडेकर व शाहूपुरी तालमीचे सचिन शितोळे यांच्यात २२२२२ रुपयांसाठी होईल. उत्तेजनार्थ पाच हजारांसाठी पारगावचे शंकर माने व इस्लामपूरच्या बाबा माने यांच्यात होईल. यासह अन्य कुस्त्या आहेत. यंदा प्रथमच महिला मल्लांच्या लढती असून श्रद्धा कुंभार (बोरपाडळे) विरुद्ध आर्या सुतार (कोल्हापूर), पल्लवी कोरवी (कळे) विरुद्ध वैष्णवी जाधव (मुंबई) यांच्यात लढत आहे.
मैदानाचा प्रारंभ आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते होईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, योगेश पाटणकर, हिंदकेसरी दिनानाथ सिंग उपस्थित असतील. याच दिवशी सकाळी नऊला धावणे स्पर्धा व सायकल शर्यती होतील. दरम्यान, शुक्रवारी गंधरात्र विधी झाला. शनिवार रात्री नऊला शासकीय गलेफ व शिडीचा धार्मिक विधी होईल. त्यानंतर रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत, अशी माहिती सरपंच तेजस्विनी वाठारकर, उपसरपंच राहुल पोवार व यात्रा समितीने दिली.
--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचे संस्थापक काही संत नाहीत...; अभिजीत दिपके-सौरभ दासांबद्दल सोनम वांगचुकांचा मोठा दावा, काय म्हणाले?

Sangola Politics: सांगोला राजकारणात ‘बापू-आबा’च्या कानगोष्टींनी खळबळ; नव्या राजकीय समीकरणाची चर्चा जोरात

MSEB Short Circuit: महावितरणच्या डीपीतील शॉर्टसर्किटने १२ एकर ऊस भस्मसात; २५ लाखांचे नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात

Pune Crime: प्रेमप्रकरणातील वादातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या; प्रियकर अटकेत, खराडी पोलिसांत गुन्हा दाखल

North Cyprus Boat Accident : समुद्रात प्रवासी बोट उलटली; २७० जण बुडाल्याची भीती, दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT