कोल्हापूर

‘डीवायपी’मध्ये लवकरच ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम

CD

08207
तळसंदे : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात करारावेळी कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, ओ. एस. इनामदार, डॉ. संदीप वाटेगावकर, अल्बाकी सय्यद आदी उपस्थित होते.
--------
‘डीवायपी’मध्ये लवकरच ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम
घुणकी, ता. २९: शेती विकसित करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज आहे. या कंपनीचा पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात कोठेही अभ्यासक्रम उपलब्ध नाही. त्यामुळे कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांना लवकरच तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, अशी माहिती डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांनी दिली.
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरु होणार आहे. याबाबत पुणे येथील बेरी एव्हीओनिक्स आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला.
बेरी एव्हीओनिक्स ही कंपनी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरशी संलग्नित असून उच्च कार्यक्षमतेचे ड्रोन तयार करते. यामध्ये ड्रोन डिझाईन, उत्पादन व विक्री या संबंधित सेवा देते. ऑटो-पायलट तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी ड्रोन बनवण्याचे ज्ञान या कंपनीमार्फत दिले जाते. सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञानातील नवनवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते एकतर उद्योजक बनू शकतात किंवा ड्रोन इंडस्ट्रीमध्ये सहज नोकरी मिळवू शकतात. करारामध्ये विद्यार्थी- प्राध्यापक विनिमय कार्यक्रम, जोड प्रकल्प, प्रगत संशोधन अशा बहूआयामी बाबी राबवण्यात येणार आहेत. कुलसचिव डॉ. जे. ए. खोत म्हणाले, ‘विविध प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रस्ताव, सेमिनार, कौशल्ययुक्त कोर्सेस संयुक्तरित्या राबवण्यासाठी कटिबद्ध राहू.’ डॉ. संदीप वाटेगावकर, बेरी एव्हीओनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक ओ. एस. इनामदार, अल्बाकी सय्यद उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT