कोल्हापूर

पेरण्या वाया जाण्याची भिती?

CD

08682
घुणकी : येथे दीपक पाटील यांच्या शेतातील जोमाने आलेले सोयाबीनचे पीक. (छायाचित्र ः संजय पाटील, घुणकी)
-----
पेरण्या वाया जाण्याची भीती?
‘रोहिणी’तील पिकांना रिमझिम पावसाने आधार
संजय पाटील ः सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. १० : रोहिणी नक्षत्रात शेतकऱ्यांनी धाडसाने पेरणी केलेल्या पिकांना आठवडाभरातील रिमझिम पावसाने आधार दिला आहे; मात्र पाऊस सुरू झाला या आशेने शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया जातात की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात अनेक वेळा वळीव पाऊस होतो आणि रोहिणी नक्षत्र सुरू होताच भात पिकाची पेरणी सुरू होते तसेच आडसाली उसाच्या लावणींनाही प्रारंभ होतो; मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. उन्हाळ्यात वळीव पाऊस झाला नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी भात पिकाची पेरणी रोहिणी नक्षत्रात केली नाही. मृग नक्षत्रात अधूनमधून झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी धाडसाने भाताची पेरणी केली. त्याची उगवणही झाली आहे. तसेच या आठवडाभरात रिमझिम झालेल्या पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, ज्वारीसह अन्य पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाऊस लागणार या आशेने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. बहुतांश ठिकाणी पिकांची उगवण होऊ लागली आहे आणि आता पावसाने पाठ फिरवली आहे. पिके करपल्यास मशागत, बियाणे, पेरणीसाठी झालेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
-----
वास्तविक पेरण्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात होतात. जुलै महिन्यात चांगला पाऊस पडतो. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि पिकांना योग्य उतारा मिळतो; पण यावेळी या आठवडाभरात पेरण्या झाल्या आहेत. हंगामाप्रमाणे पेरण्या न झाल्याने उत्पन्नात घट होणार आहे. आता पाऊस नाही झाला तर पिके करपतील. त्यानंतर दुबार पेरणी करूनही उपयोग होणार नाही.
-सचिन पाटील, प्रगतशील शेतकरी,
किणी, ता. हातकणंगले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT