कोल्हापूर

जोतिर्लिंग संस्था समूहाची १९ कोटींची उलाढाल ः मोहिते

CD

09102
घुणकी : येथील जोतिर्लिंग सहकारी उद्योग समूहातील संस्थांच्या सभेत मार्गदर्शन करताना राजवर्धन मोहिते. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
---
जोतिर्लिंग संस्था समूहाची
१९ कोटींची उलाढाल ः मोहिते
सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. १३ : येथील जोतिर्लिंग सहकारी उद्योग समूहातील संस्थांची १९ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती संस्थांचे प्रमुख व वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते यांनी येथे दिली.
येथील ज्योतिर्लिंग दूध, जयभवानी विकास, ज्योतिर्लिंग पाणी पुरवठा, गणेश विकास, यशवंत नागरी पतसंस्थांच्या वार्षिक सभेत ते बोलत होते.
यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे अहवाल वाचन व्यवस्थापक संजय पाटील यांनी केले. २० लाख रुपये नफा झाला असून, सभासदांना १२.५० टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय झाला. ज्योतिर्लिंग सहकारी दूध संस्थेचे अहवाल वाचन सचिव स्वप्निल मोहिते यांनी केले. २ लाख ५० हजार रुपये नफा झाला. गाय व म्हैस दुधातील अनुक्रमे पाच उत्पादकांना बक्षिसे दिली. ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्थेचे अहवाल वाचन व्यवस्थापक रामचंद्र मोहिते यांनी केले. सभासदांना २० टक्के लाभांश व ५ किलो साखर वाटप करण्याचे जाहीर केले. जय भवानी विकास सेवा संस्थेचे अहवाल वाचन सचिव रामचंद्र मोहिते यांनी केले. संस्थेस १ लाख २० हजार रुपये नफा झाला. गणेश विकास सेवा संस्थेचे अहवाल वाचन सचिव रामचंद्र मोहिते यांनी केले. ५५ हजार रुपये नफा झाला. सभेस ज्योतिर्लिंग दूध संस्थेचे उपाध्यक्ष माणिक मोहिते, यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मगदूम, उपाध्यक्ष शालन सूर्यवंशी, ज्योतिर्लिंग पाणीपुरवठाचे उपाध्यक्ष राजाराम शिंदे, जय भवानी विकास संस्थेचे उपाध्यक्ष तुकाराम शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

माजी सरन्यायाधीश राज्यसभेतून निवृत्त, ६ वर्षात एकही प्रश्न विचारला नाही, चर्चेत एकदाच सहभाग त्यातही वादग्रस्त विधान

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar News: बारवेलगत अतिक्रमणाचा डाव उधळला; महापालिकेची कारवाई; समर्थनगरमध्ये पत्र्याचे शेड हटविले

Sambhajinagar Hospital News: घाटीवरील ताण कमी होणार; १८९ कोटींचे माता-बाल रुग्णालय लवकरच सुरू; दूध डेअरी परिसरात अत्याधुनिक महिला रुग्णालय

SCROLL FOR NEXT