कोल्हापूर

पर्यावरण प्रेमींसाठी वृक्ष संवर्धन स्पर्धा

CD

10021
नवे पारगांव : वृक्ष संवर्धन स्पर्धेसाठी प्रा. वैशाली बुढ्ढे यांनी तयार केलेली नर्सरी.
-----
पर्यावरण प्रेमींसाठी वृक्ष संवर्धन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. २९ : वारणा महाविद्यालय, ऐतवडे खुर्द व क्रांतिज्योती महिला बहुउद्देशीय संस्था, पारगाव यांच्यातर्फे पर्यावरण प्रेमींसाठी विशेष वृक्ष संवर्धन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील यांनी दिली.
वर्षभर चालणाऱ्या वृक्ष संवर्धन स्पर्धेमध्ये महाविद्यालय व क्रांतिज्योती फाउंडेशनतर्फे संघाला पर्यावरणपूरक २५ वृक्ष मोफत दिले जातील. त्यांची देखभाल करीत त्यांचे जतन करण्याचे काम प्रत्येक संघाने करावयाचे आहे. उत्कृष्टरित्या वृक्षांचे जतन करणाऱ्या पहिल्या पाच संघांना प्रत्येकी पाच हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
क्रांतिज्योती फाउंडेशनच्या प्रमुख व वृक्षप्रेमी प्रा. वैशाली बुढ्ढे म्हणाल्या, ‘२५ गावांमध्ये प्रत्येकी २५ देशी वृक्षांची रोपे विनामूल्य दिली जातील. रोपे १५ ते ३० जूनदरम्यान दिली जातील. १५ ते ३० जून २०२५ च्या दरम्यान पाहणी केली जाईल. स्पर्धेत गटाने किंवा वैयक्तिक सहभागी होता येईल. हातकणंगले, वाळवा व पन्हाळा या तीन तालुक्यांतील निसर्ग संवर्धनासाठी काम करण्याची तयारी असणाऱ्या आणि सुरक्षित जागा व पाण्याची उपलब्धता असणाऱ्या लोकांनी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. क्षेत्रभेट घेऊन नावनोंदणी केली जाईल. इच्छुक संघाने किंवा वृक्षप्रेमींनी प्रा. वैशाली बुढ्ढे यांच्‍याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Ganeshotsav Rules: गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल; वाघोली पोलिसांचा कडक इशारा

Ayurvedic Remedies for Arthritis: संधिवातामुळे चालणंही कठीण होतंय? मग 'हे' ३ आयुर्वेदिक उपाय देतील सांध्यांना आराम!

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT