कोल्हापूर

शिवरायांची खरी ओळख पोवाड्यातून

CD

लोगो ः विवेक व्याख्यानमाला
10073
अंबप : येथील विवेक वाचनालयाच्यावतीने आयोजित ''विवेक व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना शिवशाहीर राजू राऊत. समोर श्रोते उपस्थित होते.
------------------
शिवरायांची खरी ओळख पोवाड्यातून
शिवशाहीर राजू राऊत : ‘शिवरायांची शिवशाही’वर व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. १५ : ‘शिवराय, संभाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा इतिहास अभ्यासायचा असेल तर पोवाडा हे एकमेव साहित्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती, अर्थनीती, शेतकऱ्‍यांचे कैवारी, महिलांप्रती संवेदना, नेमके स्वराज्य याचे ज्ञान पोवाड्यातून होते, असे वक्तव्य शिवशाहीर राजू राऊत यांनी अंबप (ता. हातकणंगले) येथे केले.
अंबप येथील विवेक वाचनालयाच्या व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना ‘शिवरायांची शिवशाही’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील होते. यावेळी राऊत म्हणाले, ''शिवरायांच्या स्वराज्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने त्यांनी जमवलेल्या सवंगडी, मावळ्यांच्या साथीने साकार झाले. त्याची ओळख आपणांस पोवाड्यातून होते. श्री. राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वरचित पोवाडे सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भूपाळी आणि शिवरायांचे ''पसायदान’ सादर केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून दिव्या कुलकर्णी हिने मनोगत व्यक्त केले. यावेळी राऊत, सर्जेराव मोरे, अहमद मुल्ला, बाळासाहेब हिरवे, राजेंद्र जंगम, अजय पाटील यांचा सत्कार करण्‍यात आला.
वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रा. प्रदीप तोडकर, सरपंच दीप्ती माने, माजी सरपंच डॉ. बी. के. पाटील, शंकर दाभाडे, विलास नाईक, कृष्णात माने, अशोक माळी, मनोहर जंगम, ग्रामपंचायत सदस्य जोती माने, अलका माने, माधुरी कुलकर्णी, प्राजक्ता पाटील, मनीषा नाईक, शुभम विभुते, राजाराम माने, राहुल माने, संदीप उंडे, विकास जाधव उपस्थित होते. स्वाती जंगम यांनी सूत्रसंचालन केले. वाचनालयाचे कार्यवाह विनायक माने यांनी स्वागत केले. ग्रंथपाल अमोल कुलकर्णी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Katraj News : कात्रज घाटात वनविभागाची ‘कुऱ्हाड’; १००० झाडांची कत्तल, तीन एकर परिसर भुईसपाट

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Ambajogai Theft : अंबाजोगाईत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पडदाफाश! ५० सीसीटीव्ही चाळले, जिथे वाटा केला तिथल्या तळ्यात कपडे फेकले; अन् एलसीबीच्या जाळ्यात दोघे अडकले

समृद्धीवर कारची कंटेनरला धडक, आई-वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू; पुण्याहून जालन्याला जाताना अपघात

SCROLL FOR NEXT