कोल्हापूर

मोरीअभावी रस्ता खचला

CD

10154
अंबपवाडी : येथे नाला तुंबल्याने रस्त्यावरून पाणी वाहून खचलेला रस्ता.
----
मोरीअभावी रस्ता खचला
कासारवाडी-अंबपवाडी मार्गावर पावसाचे पाणी रस्त्यावर
संजय पाटील ः सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. ११ : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काम सुरू असलेल्या हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी-अंबपवाडीदरम्यानच्या रस्त्यावर मोरी नसल्याने दोन दिवसांत झालेल्या पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून रस्ता खचला आहे.
कासारवाडी-अंबपवाडी-अंबप-तळसंदे-चावरे हा राज्य मार्ग ११९ क्रमांकाचा आहे. जोतिबा देवाकडे जाणारे भाविक या मार्गाचा अवलंब करतात. प्रत्येक रविवारी या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डिसेंबरपासून सुरू आहे. कासारवाडी व अंबपवाडीदरम्यान पोवार शेताजवळ रस्त्याच्या वरील बाजूला पाणी जाण्यासाठी नाला आहे; पण त्या नाल्यातून नैसर्गिकरित्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी कोणतीही सुविधा अथवा मोरी बांधलेली नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या पावसात डोंगर परिसर व शेतातून येणारे पाणी नाल्यातून पुढे न जाता रस्त्यावरूनच दुसऱ्या बाजूला गेले. त्यामुळे रस्त्यावर टाकलेला भराव खचून गेला. या रस्त्याची अवस्था अशीच राहिली तर पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी वाहत जाऊन रस्त्याला भगदाड पडण्याची तसेच मोठ्या पावसात रस्ता वाहून जाण्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे.
----
अपघात होण्याची शक्यता?
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून अंबप-अंबपवाडी-कासारवाडी- गिरोलीमार्गे जोतिबा असा मार्ग आहे. जोतिबा यात्रेसह प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा, रविवारी या मार्गावर वाहनांची गर्दी असते. रस्त्यावर पाणी वाहत राहिले तर रस्त्याला भगदाड पडून अपघात होण्याची शक्यता आहे.
---
या रस्त्यावरील साबळे खोरीत पांडुरंग पाटील यांच्या शेताजवळ आणि अंबप हद्दीत विठ्ठल चोपडे यांच्या शेताजवळ मोरी किंवा नळ टाकण्याची विनंती केली. तरीही दुर्लक्ष केले असून येथे मोरी न बांधल्यास पुढील काम होऊ देणार नाही.
-पांडुरंग खोत, अंबपवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT