कोल्हापूर

अंबप ग्रामपंचायतीचे काम कौतुकास्पद

CD

10271
अंबप : येथील ग्रामपंचायतीतर्फे आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजना शिबिरात महिलांना फॉर्म वितरणप्रसंगी कल्पना ढवळे, दीप्ती माने, मनीषा माने, माणिक दाभाडे, राजेंद्र माने, आदी.
----
अंबप ग्रामपंचायतीचे काम कौतुकास्पद
कल्पना ढवळे : अंबपमध्ये ‘लाडकी बहीण’ संदर्भात शिबिर
सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. १० : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंबप ग्रामपंचायतीने सूक्ष्म नियोजन करून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शिबिर आयोजित केले. यामुळे जनतेची सोय झाली. ग्रामपंचायतीचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्‍गार हातकणंगलेच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी अंबप (ता. हातकणंगले) येथे काढले.
ग्रामपंचायत अंबप येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची माहिती देणे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शिबिर आयोजित केले. यावेळी त्या बोलत होत्या. शिबिराचा प्रारंभ तहसीलदार ढवळे यांच्या हस्ते केला. सरपंच दीप्ती माने म्हणाल्या, ‘गावातील प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळावा. यासाठी ग्रामपंचायतीने ही योजना अंगणवाडी सेविका आणि आशासेविका यांच्या मदतीने प्रभावीपणे यशस्वी करण्याचे ठरवले आहे. जिल्हा परिषद माजी सदस्य मनीषा माने यांनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच माणिक दाभाडे, आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र माने यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT