कोल्हापूर

१० एच. पी. वरील कृषीपंपधारकांना वीज बील माफी करावी आणि विज पुरवठा खंडीत करु नये

CD

11741

१० एचपीवरील कृषीपंपधारकांना वीज बिल माफी करा
स्वाभिमानीचे निवेदन; आंदोलनाचा इशारा

घुणकी, ता. २४ : महावितरणने दहा एचपीवरील कृषीपंपधारकांना वीज बील माफी करावी आणि वीजपुरवठा खंडित करु नये; याबाबतचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पेठवडगांव येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.
निवेदनातील आशय असा; राज्य सरकारने कृषी पंपधारकांची वीज बिले माफ करून मोफत वीज देण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. मात्र सध्या १० एचपीवरील शेतक-यांचा वीजपुरवठा खंडित कयण्याचे काम महावितरणकडून सुरु असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
राज्य सरकारने शेतक-यांना संपूर्ण वीज माफीचे आश्वासन दिले होते. यामुळे शेतक-यांनी वीज बिले भरलेली नाहीत. यामध्ये शेतकऱ्यांचा दोष नसून सरकारने दिलेले आश्वासन पाळावे व मोफत वीज द्यावी. महावितरणने तातडीने वीज तोडणी त्वरित थांबवावी; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करू; असा इशारा संघटनेने दिला. जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख आण्णा मगदूम, जिल्हा सरचिटणीस संपत पवार, तालुकाध्यक्ष सुधीर मगदूम तालुकाध्यक्ष, प्रवीण घोरपडे, भीमराव मगदूम, सुकुमार चौगुले, जयसिंग कुरणे, वैभव कुंभार, गणपती वाघ, प्रकाश पाटील, अंकुश पाटील, मनोहर देसाई, संताजी पाटील, शिवेंद्र घोरपडे, कृष्णात मोहिते, दीपक सनदे, भगवान शिंदे, दीपक मगदूम, शरद पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT