लोगो- वर्षा व्याख्यानमाला
14192
वारणानगर : येथील वर्षा व्याख्यानमालेत ‘डिजिटल युगातील फोकस’ या विषयावर बोलताना ‘सकाळ''चे संपादक निखिल पंडितराव समोर उपस्थित.
(छायाचित्र : वैभव फोटो, वारणानगर)
--
डिजिटल युगात संयमित तंत्रज्ञान वापरा
निखिल पंडितराव : सकारात्मक बदलातूनच आंनदी जीवन बनेल
सकाळ वृत्तसेवा
वारणानगर, ता. ६ :‘आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्तीचे जीवन मोबाईल, सोशल मीडिया आणि विविध डिजिटल उपकरणांभोवती केंद्रित झाले आहे, अशा परिस्थितीत स्वतःचा फोकस टिकवून ठेवणे, वेळेचे योग्य नियोजन करणे आणि डिजिटल माध्यमांचा संयमित वापर करणे ही काळाची गरज बनली आहे, असे मत ‘सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव यांनी येथे व्यक्त केले.
येथील शारदा वाचन मंदिरच्यातर्फे वर्षा व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प ‘डिजिटल युगातील फोकस’ या विषयावर गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा दूध संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव होते.
श्री. पंडितराव म्हणाले, ‘आपल्या दैनंदिन सवयींत सकारात्मक बदल घडवून आणल्यास मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होतो, मन अधिक शांत, स्थिर आणि प्रसन्न राहते तसेच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधता येतो. आज डिजिटल उपकरणांशिवाय जीवनाची कल्पना करणे जवळपास अशक्य झाले आहे. शिक्षण, व्यवसाय, संवाद आणि मनोरंजन अशा प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र तंत्रज्ञान हे साधन म्हणून वापरले गेले पाहिजे; ते आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवणारे माध्यम बनू नये. योग्य सवयी, सकारात्मक विचार यांच्याद्वारेच व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास साधू शकते आणि आनंदी, यशस्वी व अर्थपूर्ण जीवन जगू शकते, असा संदेश देऊन त्यांनी ३० सेकंदाचा योग करून घेतला.’
यावेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष ॲड. एन. आर. पाटील, सकाळचे वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) रामकृष्ण लोकरे, प्रमोद कोरे, शिवाजी जंगम, दीपक पाटील, आदिक पाटील, ए. बी. पाटील, मोलकुमार पाटील, विक्रमसिंह मोहिते, छन्नुसिंह मोहिते, डी. पी. पाटील, मुख्याध्यापक दीपक महाडिक, सुभाष भापकर, बबन टोपुगडे, मुख्याध्यापक एम. बी. मलमे आदी उपस्थित होते. प्रा. नामदेव चोपडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांनी आभार मानले.
--------
चौकट
आजचे व्याख्यान
वक्ते - मनीषा आंबुपे कोल्हापूर
विषय-- ‘अन्न हेच औषध’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.