कोल्हापूर

कणेरी आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभाराची तालूका अधिकारी यांच्याकडे तक्रार...

CD

उपचारातील हलगर्जीपणाबद्दल
चौकशीची मागणी

केंद्रातील गोकुळ शिरगाव, ता. १२ : कणेरी (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णावरील उपचारात हलगर्जीपणा झाल्याची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे दाखल झाली आहे. याबाबत शिवराज बाळासो कोळेकर यांनी कणेरी वैद्यकीय आधिकाऱ्यांकडे चौकशीबाबत अर्ज दिला.
तक्रार अर्जात म्हटले आहे की, कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिवराज कोळेकर यांची बहीण कोमल चेतन रानगे (वय २८, रा. वाशी) यांना कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी बुधवारी (ता. ८) रोजी दाखल केले होते. रानगे मूक-बधिर आहेत. त्यांच्या आरोग्य चाचण्या करुन त्यांना त्याच दिवशी शस्त्रक्रियेसाठी घेतले होते. शस्त्रक्रियेपूर्वी भूल दिली, मात्र ती भूल त्यांना पूर्णपणे चढली नव्हती. त्या शस्त्रक्रियेवेळी आरडाओरडा करत होत्या. यावेळी तुमची बहीण शस्त्रक्रियेसाठी सपोर्ट करत नाही आहे, असे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर थोड्यावेळाने पोटातील अवयव एकमेकांना चिकटल्यामुळे शस्त्रक्रिया होऊ नाही शकणार, असे सांगण्यात आले.’ या घटनेनंतर डिस्चार्ज घेताना रुग्णांच्या नातेवाइकांनी उपचाराच्या नोंदीची फाईल मागितली असता तुमच्या बहिणीवर शस्त्रक्रिया केलेली नाही असे म्हणत कागदपत्रे देऊ शकत नाही, असे सांगितले. यामुळे मनस्ताप झाला. त्यामुळे या घटनेची लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी रुग्णाचे भाऊ शिवराज कोळेकर, आई अनिता कोळेकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, धनंजय मोरबाळे, योगेश जगदाळे, अमर बनकर उपस्थित होते.

कोट
कोमल रानगे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झाल्या होत्याः पण गर्भनलिका खाली चिकटल्याने शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना वेळीच कल्पना देण्यात आली होती.
- डॉ. भूषण मस्के, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, कणेरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT