कोल्हापूर

सामाजिक बांधिलकीतून नम्रतेने काम करा- वैशाली लोखंडे

CD

00827
कोल्हापूर : येथे इनरव्हील हेरिटेज क्लबचा नूतन पदग्रहण कार्यक्रम झाला.


सामाजिक बांधिलकीतून
नम्रतेने काम करा : लोखंडे
इनरव्हील हेरिटेज क्लबचा पदग्रहण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
गोकुळ शिरगाव, ता. ८ : आपण समाजाकडून भरपूर घेत असतो. ते सामाजिक बांधिलकीतून नम्रतेने सर्वसामान्यांना परत केले पाहिजे. नावीन्यता व कल्पकतेतून इनरव्‍हील क्लबच्या उद्दिष्‍टांची पेरणी समाजात करायची आहे. ही जबाबदारी नूतन अध्यक्षा गीता कदम टीम वर्कने यशस्वी करतील व मैत्रभावनेतून प्रत्येक उपक्रम राबविला जाईल, असा विश्‍वास वैशाली लोखंडे यांनी व्यक्त केला.
इनरव्हील क्लब, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या नूतन पदग्रहण कार्यक्रम प्रसंगी त्‍या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अरुंधती महाडिक उपस्थित होत्या.
यावेळी मावळत्या अध्यक्षा अंजली देढिया यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या १०४ विविध समाजोपयोगी उपक्रमांचा आढावा सचिव सुवर्णा गांधी यांनी घेतला. नूतन अध्यक्षा गीता कदम यांनी ताराबाई पार्क येथे वृक्षरोपणाचा प्रकल्प हाती घेतला असून, सर्वांनाच आवडेल, असा तो उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
ईनरव्हील क्लब ऑफ, कोल्हापूर हेरिटेजच्या २०२४-२५ साठीची हा स्थापना समारंभ रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे आयोजित करण्‍यात आझा. यावेळी अध्यक्षा गीता कदम, सचिव अर्चना चौगले, खजिनदार सुवर्णा गांधी, सौम्या कदम, नेत्रा कुरबेट्टी यांना पदांची नियुक्ती देण्यात आली. वर्षा चौगले यांच्या हस्ते ६० शालेय विद्यार्थ्‍यांना गणवेश प्रदान करण्यात आले. अंजली पाटील, मुग्धा केसकर, शिल्पा देशपांडे, जिग्ना वसा, पल्लवी नवले, शिल्पा संघवी, दीपाली पाटील, मधुमिता सावंत, मनीषा कदम उपस्थित होत्या. स्मिता कोंडेकर यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना चौगुले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Sangli Bank Election : चंद्रकांत पाटील, विशाल पाटील यांच्यात गुफ्तगू; खासदारांकडून राहुल महाडिक यांना शुभेच्छा, सांगली जिल्‍हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्‍ट

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT