03205
दूध वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करा
अरूण डोंगळे : ‘गोकुळ’तर्फे भुदरगडला संपर्क सभा
गारगोटी, ता. १८ : भुदरगड तालुक्यात दूध संस्थांची संख्या वाढली, पण दूध वाढले नाही. यामुळे सर्वांनी दूध वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले. दूध संस्थांच्या कामांची वेळेत पूर्तता न झाल्यास, त्यांच्या तक्रारी, पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचा पगार रोखू, असा इशाराही दिला.
कलनाकवाडी (ता. भुदरगड) येथे ''गोकुळ'' तर्फे आयोजित भुदरगड तालुक्यातील दूध संस्थांच्या संपर्क सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी गोकुळच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल श्री. डोंगळे यांचा तालुका संघाचे माजी अध्यक्ष अशोकराव भांदिगरे यांच्या हस्ते सत्कार झाला. सभासदांना किसान पॅकेजअंतर्गत धनादेशाचे वाटप केले.
संचालक नंदकुमार ढेंगे म्हणाले, `दूध संस्था, उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे.’ संचालक रणजीतसिंह पाटील यांनी, ‘जिल्हा बँकेतर्फॆ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून तालुक्यात गटतट न पाहता म्हैस-गाय खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्याची ग्वाही दिली.
विद्याधर परीट, शिवाजी शिंदे, गणेश राऊळ, संजय देसाई, सागर दाभाळे, अमोल पाटील, सतपाल आरडे सोनबा तोरसे आदींनी अतिशय परखडपणे विविध प्रश्न विचारले. त्यांना अध्यक्ष अरुण डोंगळे, संचालक नंदकुमार ढेंगे, रणजित पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, शरद तुरंबेकर ,श्री कापडिया, डॉ. मोंगले, भरत मोळे, शेखर पाटील, अजित जगताप यांनी उत्तरे दिली. सभेस संचालक प्रा. किसनराव चौगले, अभिजीत तायशेटे, बाबासाहेब चौगले, आर. के. मोरे, अजित नरके, अमर पाटील, अमरिश घाटगे, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, श्रीमती अंजना रेडेकर, डॉ. प्रकाश साळोखे, ए. एन. जोशी, बापूसाहेब आरडे, सम्राट मोरे, बाळासाहेब भोपळे आदी उपस्थित होते. सुभाष जामदार यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.