कोल्हापूर

गारगोटी : बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

CD

03793
गारगोटी : येथे दागिन्यांच्या दुकानात खरेदीसाठी ग्राहकांनी केलेली गर्दी.
....
गारगोटीत अक्षय तृतीयेला
कोट्यवधींची उलाढाल

सोने-चांदी, वाहन, साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

सकाळ वृत्तसेवा
गारगोटी, ता. १० : येथील बाजारपेठेत शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. सोने-चांदी, दुचाकी, चारचाकी वाहने, घरगुती उपकरणे, कपडे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. यानिमित्त बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.
गारगोटी हे भुदरगड तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण. यामुळे येथील बाजारपेठ नेहमीच ग्राहकांसाठी सजलेली असते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहक मोठी खरेदी करणार हे गृहीत धरून व्यापारी, उद्योजकांनी दुकाने साहित्य, वस्तूंनी सजविली होती. सकाळपासून खरेदीसाठी ग्राहकांची पावले दुकानाकडे वळत होती. ग्राहकांच्या चेहऱ्यावर खरेदी केल्याचा तर व्यापारी, विक्रेते यांच्या चेहऱ्यावर चांगली विक्री झाल्याचा आनंद पाहावयास मिळाला.
.....
हिंदू धर्मानुसार अक्षय तृतीयेचा दिवस शुभ मानला जातो. या मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. सोन्या-चांदीचे दागिने खरेदीसाठी रात्रीपर्यंत आमच्याकडे मोठी गर्दी होती. दराची चढाओढ असली तरी आजच्या दिवसाला महत्त्व असल्याने ग्राहक उत्स्फूर्तपणे व आनंदाने खरेदी करीत होते.
- संजय मालंडकर, मालंडकर ज्वेलर्स, गारगोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

आजचे पंचांग 06 ऑक्टोबर 2026! इंदिरा एकादशी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे चंद्रबळ जाणून घ्या

Marathi News Live Updates: आसाममध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का; ४.५ रिश्टर तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT