कोल्हापूर

गारगोटी : बांधापर्यंत बी-बियाणे पुरविणार

CD

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत
बी-बियाणे पुरविणार

प्रा. बाळ देसाई; भुदरगड तालुका संघाचा उपक्रम

गारगोटी, ता. ३ : ‘‘भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाच्यावतीने शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर खते, बी-बियाणे पुरविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. सभासदाभिमुख कारभाराबरोबरच तत्पर सेवा देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे,’’ अशी माहिती अध्यक्ष प्रा. बाळ देसाई यांनी दिली.
श्री. देसाई म्हणाले, ‘‘भुदरगड तालुका संघाच्या २१ शाखांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे दर्जेदार भात बियाणे, रासायनिक खते विक्रीसाठी ठेवली आहेत. शेतकरी बांधवांना शेतीच्या बांधावर खते पुरविल्यास संघाबरोबर शेतकऱ्यांचा देखील फायदा होईल, हा असा उद्देश ठेवून निर्णय घेतला आहे.’ उपाध्यक्ष शामराव देसाई, रिपब्लिकन नेते पी. एस. कांबळे, शिवसेना तालुकाप्रमुख संग्राम सावंत, संचालक मानसिंग पाटील, विजयराव भांदिगरे, शामराव इंदुलकर, मारुती पाटील, प्रताप मेंगाणे, अरुण बेलेकर, नामदेव देसाई, प्रा. विजय कोटकर, बाबूराव देसाई, शहाजी देसाई, नारायण पाटील, प्रा. एच. आर. पाटील, सम्राट मोरे, शंकर पाटील, अनुसया तळकर, सई सावंत, अशोक यादव, बजरंग सुतार, प्रकाश कांबळे उपस्थित होते. व्यवस्थापक दतात्रय मांगोरे यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT