कोल्हापूर

गारगोटीत ब्लड बँकेची गरज

CD

संग्रहित फोटो वापरावा...
.............
गारगोटीत ब्लड बँकेची गरज

रक्ताची वाढती मागणी : रक्तासाठी नातेवाइकांना करावी लागते धावपळ

सकाळ वृत्तसेवा
गारगोटी, ता. ६ : दोन लाखांवर लोकसंख्या असलेल्या भुदरगड तालुक्यात एकही रक्तपेढी (ब्लड बँक) नाही. तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या आणि रक्ताची वाढती मागणी लक्षात घेता स्थानिक पातळीवर रक्तपेढीची नितांत गरज भासू लागली आहे. येथे रक्ताअभावी रुग्णांची हेळसांड होत आहे, तर रक्त उपलब्ध करताना नातेवाइकांची धावपळ उडत आहे.
भुदरगड तालुक्यातील गारगोटी हे तालुक्याचे ठिकाण आहे. शासनाने येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला आहे. याचबरोबर शहरात अनेक खासगी रुग्णालये आहे, तर तालुक्यात ग्रामीण रुग्णालये, उपकेंद्रे कार्यरत आहे. याठिकाणी दररोज हजारो रुग्ण उपचार घेतात. मात्र, यातील गंभीर आजार व दीर्घकाळ आजारी असणाऱ्या अनेक रुग्णांना सतत रक्ताची गरज भासत आहे.
येथील शासकीय व खासगी रुग्णालयांत स्थानिक पातळीवर दैनंदिन रक्त संकलन व रक्तसाठा करणारी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. यामुळे रक्ताची वारंवार गरज भासणाऱ्या रुग्णांना कोल्हापूर किंवा इतर ठिकाणच्या रुग्णालयात न्यावे लागते. याचा रुग्णाला निमूटपणे शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. शिवाय नातेवाइकांना रक्त मिळविताना वशिला, पैसा, वेळ अशा पातळीवर तारेवरची कसरत करावी लागते.
भुदरगड तालुक्यात गावागावांतील अनेक मंडळे, संस्था दरवर्षी सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर घेतात. या शिबिरावेळी स्थानिक रक्तपेढी नसल्याने बाहेरील रक्तपेढीचे सहकार्य घेतात. परंतु जेव्हा रक्तदात्याच्या नातेवाइकाला रक्ताची गरज भासेल तेव्हा तेथून बऱ्याचवेळा वेळेत रक्त मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे स्थानिक पातळीवर रक्तपेढी सुरू व्हावी, अशी मागणी होत आहे.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT