कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराजांचे कार्य कृतीतून पोहोचले

CD

3962
गारगोटी : भुदरगड पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे आयोजित परिसंवादात बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी प्रबोध कांबळे. शेजारी अंधारे, डॉ. मंजुषा माळी आदी.
.....
राजर्षी शाहू महाराजांचे
कार्य कृतीतून पोहोचले

शिक्षण विभागातर्फे आयोजित परिसंवादातील सूर

सकाळ वृत्तसेवा
गारगोटी, ता. ४ : ‘राजर्षी शाहू महाराजांचे कार्य कृतीतून सर्वदूर पोहोचले. त्यांचा दूरदृष्टिकोन, कल्पकता, निर्णय क्षमता, नेतृत्वातील वेगळेपणा अनेक धाडसी आणि चांगल्या निर्णयातून दिसून येतो,’ असा सूर येथील परिसंवादात उमटला.
भुदरगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत ‘राजर्षी शाहू महाराज : शिक्षण व सामाजिक सुधारणा’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार अंधारे होते. प्राचार्या डॉ. मंजुषा माळी प्रमुख उपस्थित होत्या. हा कार्यक्रम उदाजीराव डी. एड. कॉलेजमध्ये झाला.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक कौलवकर, शिक्षक राजेंद्र यादव, व विजय आदित्य या तीन व्याख्यात्यांनी मार्गदर्शन केले. तसेच डी. एड., बी. एड. प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्तपणे शाहू महाराजांविषयी विचार व्यक्त केले. राजर्षी शाहू महाराजांचा जीवनपट हळुवारपणे टप्प्याटप्प्याने उलगडत नेल्यामुळे श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. यामध्ये शाहू पूर्वकालीन सामाजिक जीवन, शाहू छत्रपती कोल्हापूर संस्थानच्या गादीवर कसे दत्तक झाले, शाहू महाराजांची प्राथमिक शिक्षणाची धोरणे, स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य, वसतिगृह चळवळ, आरक्षणाचे धोरण, वेदोक्त प्रकरण, कला, क्रीडा, नाट्य, सांस्कृतिक क्षेत्रांतील योगदान आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
शिक्षण विस्तार अधिकारी प्रबोध कांबळे यांनी प्रास्ताविक केले. नितीन कांबळे व जहाँगीर मुल्ला यांनी नियोजन केले.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्र सरकारकडून बिनशर्त माफी! अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, नोटिसीला गृह सचिवांनी दिलं उत्तर

IDBI Bank Fairfax: खिशात फक्त ₹64 घेऊन कॅनडात गेले, आता IDBI Bank च्या ₹53 हजार कोटींच्या डीलमुळे चर्चेत; कोण आहेत प्रेम वत्स?

IND vs WI 4th T20: भारताच्या हातातून सामना कसा निसटला? संजू सॅमसनने सांगितला टर्निंग पॉइंट; म्हणाला, “ते दोघे खेळत होते, तोपर्यंत…”

Latest Marathi News Update : एसटी प्रवाशांना मोठा दिलासा, भाडेवाढ होणार नाही; परिवहन मंत्र्यांची माहिती

मी तुम्हाला पचणार नाही रे... भाजपकडून निवडणूक लढवण्याची फडणवीसांची ऑफर, नाना पाटेकरांनी स्पष्ट नकार का दिला? उत्तराने नेतेही झाले चकित

SCROLL FOR NEXT