कोल्हापूर

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेतर्फे उपोषण

CD

रिपब्लिकन विद्यार्थी
सेनेतर्फे उपोषण
हातकणंगले ः सम्मेद शिखरजी या पावित्र स्थानाला झारखंड सरकारने तीर्थश्रेत्र म्हणून घोषित केले होते. याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी मूक मोर्चे निघाले होते. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेतर्फे आज येथे एकदिवसीय उपोषण करून झारखंड सरकारचा निषेध केला. जिल्हाध्यक्ष शिरीष थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य डी. सी. पाटील, दलितमित्र अशोकराव माने, वीर सेवा दलाचे सहकार्यवाह अमोल पाटील, कर्मवीर मल्टिस्टेटचे बाबासो हुपरे व भूपाल गिरमल आदी उपस्थित होते.
--------
मिनी ऑलम्पिक
हॉकी स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी : पहिल्या महाराष्ट्र मिनी ऑलम्पिक हॉकी स्पर्धेसाठी येथील दिग्विजय नाईक यांची संघाच्या स्पर्धा प्रमुख म्हणून निवड झाली आहे. विनोद ढोले यांची पंच म्हणून निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्हा पुरुष संघात प्रथमेश गायकवाड, रोहन माधव, विष्णू देढे या तीन खेळाडूंची निवड झाली. स्पर्धा बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्टस्‌‌ कॉप्लेक्स येथे ५ ते ११ जानेवारीपर्यंत होणार आहेत. खेळाडूंना मनोज इनानी, संजय पोवाडे, उदय मेटे, सुहास पाटील, नितीन डंबाळ, अभिजित कवडे आदींचे मार्गदर्शन लाभले.
------------
''मी सी ए होणारच'' वर
शाहू हायस्कूलमध्ये व्याख्यान
इचलकरंजी: छत्रपती शाहू हायस्कूल येथे दहावी अभ्यासगट अंतर्गत ''मी सी ए होणारच'' या विषयावर व्याख्यान झाले. माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने हे व्याख्यान झाले. सीए विजय दुधरकर यांनी चार्टेड अकौंटंट होण्याबद्दलची माहिती समजावून सांगितली. सीए असोसिएशनचे अध्यक्ष सीए मुकेश मालानी व सीए दिपक बसूदे, अलका शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. पी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी संघाचे राजू नदाफ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रतिभा लंगोटे हिने आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई-उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT