कोल्हापूर

साहित्य नसतानांच बिल अदा.. हातकणंगले नगरपंचायतीमधील प्रकार उघडकीस महिला नगरसेविका व उपनगरांध्यक्षांमध्ये जुंपली

CD

हातकणंगलेत उपनगराध्यक्ष- नगरसेविकांत वादावादी
खेळण्याच्या साहित्यासाठी आलेल्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
हातकणंगले ता. २५ ः शहरात खेळण्याच्या साहित्यासाठी आलेल्या निधीपैकी काही साहित्याची खरेदी न करताच थेट बिले काढल्याने याची माहिती घेण्यासाठी नगरपंचायतीत गेलेल्या नगरसेविका रोहिणी खोत यांना अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यांच्या प्रभागात हे साहित्य बसवल्याचे दाखविले आहे ते उपनगराध्यक्ष केतन कांबळे यांनी माझ्या प्रभागात झालेल्या कामांची चौकशी तुम्ही का करता असे म्हणत दोघांत वादावादी झाली.
बालकल्याण व शिक्षण विभागाकडून खेळण्याच्या साहित्यासाठी निधी नगरपंचायतिस प्राप्त झाला होता. यातून शहरातील प्र.क्र.४ मधील शाहूनगर या परिसरात खेळाचे साहित्य बसविले आहे. मात्र, प्रत्यक्षात एवढा निधी मंजूर नसतानाही ७ लाख ७५ हजारांची  बिले काढली आहेत. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नगरसेविका रोहिणी खोत यांनी प्रशासनाकडे माहिती मागीतली. मात्र प्रशासनाकडून माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली.  दुसऱ्या दिवशी माहिती मिळाल्यानंतर संबंधित कागदपत्रातून टेंडर भरलेल्या १८ जणांचे खेळण्यांचे दरपत्रकच गायब असल्याचे  खोत यांना निदर्शनास आले. त्यामुळे खोत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

कोट..
झालेला प्रकार निंदनीय आहे. माहिला नगरसेविकांना दिली जाणारी वागणूक चुकीची असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे.
-अरूणकुमार जानवेकर, नगराध्यक्ष

कोट..
कंत्राटदाराने साहित्य खरेदी केलेले आहे. मात्र, उदघाटनांसाठी ते साहित्य बसवलेले नाही. कदाचित संबंधित लोकप्रतिनिधींना याबाबतची माहिती नसेल.
-विशाल पाटील, मुख्याधिकारी, नगरपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT