कोल्हापूर

अन्न व औषध प्रशासन कारवाई- सुधारीत

CD

हातकणंगलेत तीन पान टपऱ्यांवर
‘अन्न,औषध’चा छापा : तिघांना अटक
हातकणंगले ता. १० ः अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज येथे छापा टाकून तीन पान टपऱ्यांवर कारवाई करत तिघांना अटक केली. कारवाईत मोठ्या प्रमाणावर मावा व गुटखा जप्त केला. राजू वसंत निरमले (वय ३३, रा. नेज ता. हातकणंगले), नितीन रामचंद्र डोणे (वय ३७ रा. कुंभोज) व आरीफ मुबारक मुजावर ( वय २४ रा. हातकणंगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कीर्ती देशमुख (अन्न सुरक्षा अधिकारी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, एरव्ही राजरोस सुरू असलेल्या पान टपऱ्यांवर ऐन दिवाळीत ही कारवाई म्हणजे फार्स असल्याची चर्चा होती. याच विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांकडून भेट घेतल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनीच बोलून दाखवली. पोलिस ठाण्यानजीक मावा, गुटखा विकला जात असतानाही पोलिस यंत्रणा, नगरपंचायत प्रशासन किंवा अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागातर्फे ठोस कारवाई होत नाही. याबाबत दै. ‘सकाळ’ने वारंवार आवाज उठवला आहे.

कोट
उद्दिष्टपूर्ती कारवाया नेहमीच सुरू असतात. अधिकारी बदलांमुळे गेले काही महिने कारवाई झाली नव्हती. ती आज केली गेली. व्यापाऱ्यांच्या ‘भेटी’ची माहिती घ्यावी लागेल.
- दयानंद शिर्के, सहाय्यक आयुक्त (ग्रामीण) अन्न व औषध प्रशासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT