कोल्हापूर

अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल

CD

03902
हातकणंगले : येथील पोलिस स्टेशनच्या शांतता समितीच्या बैठकीत बोलताना रोहिणी साळुंके. शेजारी अशोक सायकर.
------------
...अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल
रोहिणी साळुंके : हातकणंगले पोलिस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
हातकणंगले, ता. ४ : लोकसभेची निवडणूक भयमुक्त व्हावी. निवडणुकीच्या प्रचारामध्ये वैयक्तिक टिकाटिप्पणी करू नये. सोशल मीडियावर सायबर विभागाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. जातीय तेढ निर्माण होईल, अशी कोणतीही वादग्रस्त पोस्‍ट टाकू नये. अन्यथा, कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जयसिंगपूर विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंके यांनी दिला.
हातकणंगले पोलिस स्टेशनमध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘एप्रिलमध्ये रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, महावीर जयंती, हनुमान जयंतीसारखे अनेक धार्मिक सण, सामाजिक उत्सव व जयंत्या साजऱ्या होणार आहेत. ते सर्व शांततेत व्हावेत. तसेच मिरवणुकीसह सर्व कार्यक्रमांसाठी रात्री दहापर्यंतच परवानगी देण्यात येणार आहे.’
पोलिस निरीक्षक अशोक सायकर म्हणाले, ‘धार्मिक सणांच्या व जयंतीच्या मिरवणुका काढताना प्रत्येकाने पूर्व परवानगी घेणे गरजेचे आहे. धार्मिकस्थळ अथवा मंदिरासमोर मिरवणूक रेंगाळू देऊ नये. मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीमचा वापर टाळावा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.’
बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बबलू मकानदार, माजी सभापती अविनाश बनगे, चंद्रकांत पाटील, बाबासाहेब शिंगे, बाळगोंडा पाटील, सुधीर मोघे, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT