कोल्हापूर

मुलापाठोपाठ आईचाही मृत्यू

CD

03974
मुलापाठोपाठ अपघातातील
जखमी आईचाही मृत्यू

हातकणंगले, ता. ३० : दोन दिवसांपूर्वी कुंभोज - दानोळी मार्गावर मोटार व मोटासायकल यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा आज उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला होता.
हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील तानाजी बाजीराव कोळी, त्यांची आई शांताबाई कोळी आणि मुलगी वैष्णवी कोळी हे सांगलवाडीहून दोन दिवसांपूर्वी मोटारसायकलवरून दानोळी, कुंभोज मार्गे माणगावकडे येत होते. ते कुंभोज-दानोळी मार्गावरील चौगुले मळ्याशेजारी आले असता मोटार आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार तानाजी बाजीराव कोळी (वय ४८) जागीच ठार झाले होते, तर मागे बसलेल्या शांताबाई (वय ७०), मुलगी वैष्णवी (वय १३) गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. शांताबाई यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना आज सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. अपघातात मुलगा आणि आईचा मृत्यू झाल्याने माणगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT