कोल्हापूर

बेकायदेशीर फटाका कारखान्यावर छापा

CD

बेकायदेशीर फटाका कारखान्यावर छापा
साजणी येथे कारवाईः स्फोटक पदार्थांपासून बेकायदेशीररीत्या निर्मिती

हातकणंगले, ता. १२ः साजणी (ता. हातकणंगले) येथे स्फोटक पदार्थापासून बेकायदेशीररीत्या फटाके बनविण्याच्या कारखान्यावर छापा टाकून एक लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई हातकणंगले पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी पथकासह केली आहे. संशयित आरोपी शकीला मोहम्मदशफी मुजावर (रा. फुलेनगर, कबनूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत हातकणंगले पोलिसांत सुरू होते. याबाबतची फिर्याद पोलिस अंमलदार विकास घस्ते यांनी दिली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील माने करत आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, गेल्या अनेक वर्षांपासून साजणी (ता. हातकणंगले) येथे स्फोटक पदार्थांपासून फटाके बनविण्याचा कारखाना कबनूर येथील संशयित आरोपी शकीला मोहम्मदशफी मुजावर चालवित होत्या. हातकणंगले पोलिस ठाण्याच्या पथकाला ही माहिती समजल्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलिस पथकासह स्फोटकांपासून फटाके बनविण्याचे कारखान्यावर छापा टाकला. यामध्ये फटाके तयार करण्याचे साचे, प्लास्टिक बकेट, लोखंडी स्टॅन्ड, प्लास्टिक पोती, रंगीत आउट, केमिकलयुक्त कलर, अल्युमिनियमची पातेली, पुंगळ्या, स्फोटक पदार्थांपासून फटाके तयार करण्याचे साहित्य, आदी एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतचा गुन्हा रात्री उशिरापर्यंत दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

SCROLL FOR NEXT