कोल्हापूर

पंचगंगा कारखाना .. सभा

CD

04228
गंगानगर : दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्यासह उपस्थित संचालक व मान्यवर.
-
04229
गंगानगर : सभेनंतर माजी अध्यक्ष रजनीताई मगदूम बाहेर पडताना कार्यकर्त्‍यांत झालेली हमरीतुमरी.
..............................

भ्रष्टाचाराच्या आरोपाने कारखान्याला बदनाम करू नये
पी. एम. पाटील : पंचगंगा साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा

हातकणंगले, ता. १५ : विरोधकांनी भ्रष्टाचाराचा आरोप करत कारखान्याला बदनाम करू नये. शंका असतील त्यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी. सर्वांना समोरासमोर उत्तर देण्याची तयारी असल्याचे पंचगंगा कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी सांगितले. कारखान्याच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले, अण्णांनी सूतगिरणीची स्थापना केली. त्यातून सभासदांना ऊर्जितावस्था देण्याचे प्रयत्न केले. कारखाना १४ वर्षांपूर्वी रेणुका शुगर्सला चालविण्यासाठी दिल्यानंतर अंतर्गत सर्व मशिनरी बदलली. त्यावेळी पाच हजारांची क्षमता असलेला कारखाना २५०० क्षमतेने वाढविला आणि ७५०० क्षमता केली. तेही कमी कामगारांच्या संख्येवर. फक्त आता कारखान्याची इमारत जुनी आहे. भविष्यात त्याचीही व्यवस्था केली जाईल.
कारखाना चालवायला देताना कारखान्याने एकही रुपयाची गुंतवणूक केली नाही. एकूण देणी १०७ कोटी देणे बाकी पूर्ण केल्यानंतर वाढीव देणीसाठी काही स्वरूपात मुदतवाढ दिली जाईल. डिस्‍टिलरी टेंडर पद्धतीने भाड्याने दिली आहे. नाबार्डच्या छानणीनंतर त्यांचे पत्र घेऊन जमीन विक्रीचे टेंडर अधिक रकमेच्या विक्रीतून दिले आहे. पंचगंगेला नेहमीच अर्थसहाय्य करणाऱ्या मंडळीकडून अर्थसहाय्य घेऊन कारखाना उभारला आहे.’ प्रभारी कार्यकारी संचालक एन. वाय. भोरे यांनी स्वागत व विषय वाचन केले. रावसाहेब भगाटे यांनी आभार मानले.

चौकट
सभेनंतर कार्यकर्त्यांत हमरीतुमरी
दरम्यान, सभा शांततेत पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी हाणामारी केल्याने सभेला गालबोट लावले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यांत आले. मात्र, त्यानंतर एकमेकांची देणी काढण्यावरून कार्यकर्त्यांत हमरीतुमरी झाली. यावेळी काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता.
-----

‘मंजूर’, ‘मंजूर'' घोषणा
देण्यासाठी भाडोत्री गुंड

रजनीताई मगदूम यांचा आरोप

हातकणंगले, ता. १५ : सत्ताधाऱ्यांकडून आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध करीत असून, सत्ताधाऱ्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय वाचन करताना ‘मंजूर’, ‘मंजूर'' घोषणा देण्यासाठी भाडोत्री गुंड आणले होते. मंजुरची घोषणा देणारा एकही सभासद नव्हता. सभेतील वाचन केलेले सर्व विषय नामंजूर आहेत. अध्यक्ष सभासदांच्या प्रश्नांना उत्तर न देता ‘ऐ तू खाली बस’ असे ज्येष्ठ सभासदांना धमकावत होते, असा आरोप माजी अध्यक्ष रजनीताई मगदूम यांनी केला. सभा झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
मगदूम म्हणाल्या, ‘सर्वसाधारण सभेत सहकार संपत असल्याचे दिसले. कारखान्यात गुंडगिरी व फसवेगिरी वाढली आहे. स्वर्गीय अण्णांनी सभासद व कामगारांना मालक समजून कामकाज केले. पण, सध्या कारखान्यात मनमानी, झुंडशाही सुरू आहे. कारखान्याची प्रॉपर्टी टिकावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. कारखान्याला सभासदांचा ऊस घेतला जात नाही. बाहेरच्या लोकांचा ऊस आणला जातो. कामगारांना पगार व तोडणी वाहतुकीची देणी देण्यासाठी माझी स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून लक्ष्मी ऑरगॅनिककडून पैसे आणले होते. कारखाना वाचविण्यासाठी लढा सुरू राहणार आहे.
यावेळी पुंडलिक जाधव, भालचंद्र कागले, अशोक पाटील, सुकुमार गडगे, रमेश चौगले, शोभा कोळी, महादेव कुंभार, संतोष आवटी, बाळासाहेब कुंभार, आण्णाप्पा दतवाडे, शिवाजी कांबळे, रायगोंडा पाटील, राजेंद्र माने, मुख्याध्यापक दीक्षित, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Guinea Landfill Collapse : मुसळधार पावसाचा कहर! कचऱ्याचा डोंगर कोसळला; ३० जणांचा मृत्यू, अनेक झोपड्या ढिगाऱ्याखाली

Akola Ganeshotsav Special Trains: अकोल्यातून कोकण गाठणे सोपे;गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या; नागपूर-मडगाव गाड्यांना थांबा

Pune News : पुण्यात आठ मतदारसंघांत मोठ्या फेरबदलाची शक्यता! तब्बल १४ लाख मतदार वगळणार

Plane Service : पुणे-दिल्ली विमानाला तब्बल सहा तासांचा उशीर

Akola Airport Expansion: विमानतळ विस्ताराला वेग; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू; विमानतळ प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव

SCROLL FOR NEXT