कोल्हापूर

चर मुजवून रस्ता अरूंद करण्याचा डाव , परिसरांतील नागरिकांचे निवेदन

CD

रस्ता अरुंद करणाऱ्यावर
कारवाईची मागणी; पालिकेला निवेदन

हातकणंगले, ता. २२ ः येथील नर्मदे गल्ली ते श्रीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूने गट क्रमांक २४४ मध्ये एका शेतकऱ्याने व त्याच्या भावाने रस्त्याच्या उत्तरेकडील पाण्याची चर बुजवून भराव टाकून रस्ता अरुंद केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत त्या परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधितावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर सुमारे १५० नागरिकांच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, येथील नर्मदे गल्ली ते श्रीनगर भागात जाणाऱ्या रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूचे शेतकरी आणि त्याचा भाऊ यांनी रस्त्याच्या (उत्तरेकडील) बाजूची पाण्याची चर बुजवून भराव रस्त्यावर टाकून रस्ता अरुंद केला आहे. यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होऊन नागरिकांना त्रास होणार आहे. चर बुजविल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात शिरू शकते. रस्ता अरुंद झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सध्या डांबरीकरणाचे काम चालू आहे. त्या रस्त्याच्या एका बाजूचे पाणी जाण्याचा मार्ग बंद होत आहे. याबाबत नगराध्यक्ष अजितसिंह पाटील म्हणाले, संबंधित शेतकऱ्याने असा प्रकार करणे गरजेचे नव्हते. नागरिकांच्या तकारी आल्या आहेत. जमिनिची रीतसर मोजणी करून सनदशीर मार्गाने हा तिढा सोडविला जाईल.
HTK26B05629

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain News : उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा; शहरात मुसळधार पावसाची हजेरी, अनेक भागांत गारपीट

LSG vs RR Live: रिषभ पंत धडपडला... दोन्ही फलंदाज एकाच दिशेला.. चूक अन् राजस्थानला डोकं वर काढण्याची मिळाली संधी Video

Amravati Crime : जन्मदात्या आईचे मुलीसोबत धक्कादायक कृत्य, कारण वाचून तुम्हालाही येईल संताप

Pune News : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या; परीक्षा होण्यापूर्वीच समाजमाध्यमात प्रश्नपत्रिका प्रसारित

Buldhana News : गरिबीमुळे लग्न जुळत नाही, बुलढाण्यात दोन तरुणांनी जीवन संपवलं

SCROLL FOR NEXT