कोल्हापूर

हुपरी मध्ये कालव्यातील मोटारीत मृतदेह; घातपात की अपघात संशय

CD

02211,02212

* फोटो: मोतीराम रजपूत

हुपरी : येथे दूधगंगा डाव्या कालव्यात मृतदेहासोबत आढळून आलेल्या मोटारप्रकरणी चौकशी करताना पोलिस निरीक्षक पंकज गिरी आदी.

...

हुपरीजवळ कालव्यात मोटारीसह मृतदेह

घातपाताचा संशय; चार महिन्यांपासून होते बेपत्ता

हुपरी, ता. ११ : येथील जवाहर सहकारी साखर कारखाना परिसरातील ज्योतिर्लिंग मंदिराच्या पिछाडीस असलेल्या दूधगंगा डाव्या कालव्यात मृतदेहासह चारचाकी मोटार आज सकाळी आढळून आली. मोतिराम महादेव रजपूत (वय ६५, रा. अंबाईनगर, रेंदाळ) असे मृताचे नाव आहे. मोटारीत सडलेल्या अवस्थेत मोतिराम यांचा मृतदेह होता. ते चार महिन्यांपासून बेपत्ता होते. मोटारीचा रंगही काळा तांबूस आढळून आल्याने ही घटना अपघात की घातपात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. हुपरी पोलिसांत घटनेची प्राथमिक नोंद पाण्यात बुडून मृत्यू अशी झाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब पथकास पाचरण केले होते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत जागेवरच शवविच्छेदन करून घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनेचा सर्वंकष तपास केला जात असून, फॉरेन्सिक लॅब पथक व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर रजपूत यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी दिली.

सुमारे चाळीस फूट खोल कालव्यातील पाण्यात चारचाकी मोटार पडल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्यांना दिसून आले. याची माहिती निनावी फोनद्वारे मिळताच सहायक निरीक्षक पंकज गिरी, उपनिरीक्षक गणेश खराडे, उपनिरीक्षक रावसाहेब हजारे आदींनी पथकासह धाव घेतली. जीवरक्षक जीवन नवले यांच्या मदतीने मोटार क्रेनद्वारे बाहेर काढली. त्यावेळी मोटारीत (एम एच २२ इ टी १७६२) पुरुषाचा मृतदेह आढळला. त्यामुळे पोलिस व उपस्थितही चक्रावून गेले. मोटारीचा रंगही काळा तांबूस असा बदलल्याचे दिसून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त होऊ लागला. यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती.

दरम्यान, माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या नातेवाईकांनी मृतदेह मोतिराम रजपूत यांचा व मोटारही त्यांचीच असल्याचे ओळखले. घटनेची वर्दी पुतण्या महादेव जयवंत रजपूत यांनी दिली असून, त्यामध्ये मोतिराम यांना दोन वर्षांपूर्वी लकवा आजार जडल्याचे व त्यावरील उपचारासाठी जाण्या-येण्याकरिता मोटार घेतल्याचे व ते सोबत गावातील ड्रायव्हरला घेऊन जात. तसेच त्यांना गाणी ऐकण्याची सवय व मोटारीची बॅटरी चार्ज होण्यासाठी ते कायम मोटार रेस करत असल्याचे म्हटले आहे.
...

पोलिसांपुढे तपासाचे आव्हान
मोतिराम रजपूत यांचे घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर पत्र्याचे शेड आहे. तिथेच ते एकटे राहात होते. ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने हुपरी पोलिस ठाण्यात ऑक्टोबर २०२२ मध्ये दिली होती. त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत लगतच्या कालव्यात मोटारीसह आढळून आल्याने तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.
""""""""""

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT