कोल्हापूर

हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात हुपरीत १७ बकरी ठार

CD

हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात
हुपरी येथे १७ बकऱ्या ठार
हुपरी, ता. १३ : हिंस्र प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात येथे शेतात बसवलेल्या १७ बकऱ्या मृत्युमुखी पडल्या. यामुळे दोघा मेंढपाळांना आर्थिक नुकसानीचा मोठा फटाका बसला आहे. दरम्यान, वनखात्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ही घटना शनिवारी (ता. ११) रात्री घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी, येथील शरद गाट यांच्या तळंदगे रोडलगतच्या तपोवन मळा येथील शेतात बापू कृष्णा मुधाळे, साताप्पा बापू मुधाळे, सिद्धू मुधाळे (सर्व रा. हुपरी) या तिघा मेंढपाळांच्या चारशेंच्या वर मेंढ्यांचा कळप खतासाठी बसवण्यात आला आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटांसह पाऊस सुरू झाला. त्यामुळे सोबतचे मेंढपाळ शेजारच्या शेडमध्ये आडोशाला गेले. यावेळी हिंस्त्र प्राण्यांनी मेंढरांच्या तळावर हल्ला चढवला. त्यात बापू मुधाळे यांच्या १२ व साताप्पा मुधाळे यांच्या पाच अशा १७ बकऱ्या मृत्युमुखी पडल्या.
याबाबतची माहिती समजताच वनरक्षक मंगेश वंजारे, तालुका पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी डॉ. माळी, हातकणंगलेचे वनपाल विजय कांबळे, वनरक्षक अरुण खामकर, लहू भंडारे, आदींच्या पथकाने घटनेचा पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

Viral Indian Wedding Funny Moment : या नवरदेवानं तर हद्दच केली! लग्नात 'चमकायच्या' नादात अंगालाच गुंडाळली लाईटिंग; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Shani Gochar 2026: 21 मार्चपासून शनि नक्षत्र गोचर! ‘या’ 3 राशींचा सुरू होणार गोल्डन टाईम

IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

Equestrian Statue: बीबीदारफळमध्ये मध्यरात्रीच उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; हटविण्यास ग्रामस्थांचा विरोध, पाेलिसांशी वादावादी!

SCROLL FOR NEXT