कोल्हापूर

तळंदगे येथे ड्रोन फवारणीचा प्रारंभ

CD

02925
तळंदगे : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना व इफकोतर्फे ड्रोन फवारणी अभिनव योजनेच्या प्रारंभप्रसंगी बोलताना राहुल आवाडे. शेजारी डॉ. एम. एस. पोवार, सूरज बेडगे, आदी.
------------
तळंदगे येथे ड्रोन फवारणीचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
हुपरी, ता. २ : येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना व इफकोतर्फे तळंदगे येथे ड्रोन फवारणीचा प्रारंभ कारखान्याच्या केन कमिटीचे चेअरमन डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्‍यात आला. यावेळी इफकोचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. एम. एस. पोवार प्रमुख उपस्थित होते.
राहुल आवाडे म्हणाले, ‘संस्थापक-अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापनेपासून कारखान्याने आजपर्यंत सुमारे १४ कोटींचे अनुदान स्वनिधीतून दिलेले आहे. कारखाना व इफको यांच्यातर्फे ऊसपुरवठा करणाऱ्या सभासद व बिगर सभासदांना प्रतिएकरी रुपये ३०० सवलतीच्या दरामध्ये बिनव्याजी क्रेडिटवर ड्रोनद्वारे ऊस विकास योजनेतून दिली जाणारी सूक्ष्म युरिया व इतर अन्नद्रव्ये आणि कीटकनाशके यांची फवारणी करून दिली जाणार आहे.’ यावेळी डॉ. एम. एस. पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.
संचालक सूरज बेडगे, आदगोंडा पाटील, अभय काश्मिरे, शेखर पाटील, विजय कुंभोजे, संग्राम पाटील, इफकोचे कोल्हापूर क्षेत्र अधिकारी विजय बुनगे, सीमा पाटील, कपिल पाटील, उपमुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे यांनी केले. आभार जवाहर पाणीपुरवठा तळंदगेचे अध्यक्ष सुरेश भोजकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IDBI Bank Privatisation : आयडीबीआय बँक झाली पूर्णपणे खाजगी! ५२,८७८ कोटी रुपयांना ६०% हिस्सा कॅनेडियन कंपनीला विकण्यास मंजुरी

Pune News : पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या आठवरून दहा; जुन्नर, आंबेगावचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश

Maharashtra Live News : "पाच हजारांची मदत म्हणजे जखमेवर मीठ"; दुष्काळी मदतीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

Sugarcane Rate Agitation : ऊस दराचा भडका! ३१ तासांनंतर महामार्गावरील चक्काजाम मागे; केंद्रीय मंत्र्यांच्या घराकडे 'शेतकरी पदयात्रा' सुरू, साताऱ्यात 'काटा बंद'चा इशारा!

Sinhgad Fraud News : शंभर कोटींच्या बिनव्याजी कर्जाचे आमिष; जाधवर संस्थेची ८७.६१ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार; नऱ्हे पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT