कोल्हापूर

हुपरी: यळगुड खुनाचा फॉलोअप

CD

गिरीश पिल्लई 03029

यळगुड खूनप्रकरणात
अधिक जणचा सहभाग

पोलिस तपासातील माहिती

हुपरी, ता.३०: यळगुड येथील वाहनांचे पंक्चर काढणाऱ्या गिरीश विश्वनाथ पिल्लई ( वय ४७ ) या मेस्त्रीचा डोक्यात टॉमीचे वर्मी घाव घालून तसेच पोटात चाकू खुपसून निर्घृणपणे झालेला खून हा नाजूक प्रकरणातून कटरचून एकापेक्षा अधिक जणांनी केल्याचे प्रथमदर्शनी पोलिस तपासात पुढे येत आहे. ही माहिती इचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याप्रकरणी पोलीसांनी एका महिलेसह आठ ते दहा जणांची कसून चौकशी केली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच हुपरी पोलिसांच्या तीन स्वतंत्र पथकांद्वारे संशयीत आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी दशरथ वसंत चव्हाण यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
हुपरी यळगुड मार्गावरील जवाहर साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपासमोर असलेल्या वाहनांचे पंक्चर काढणाऱ्या दुकानातील गिरीश पिल्लई यांच्या खुनाची घटना गुरुवारी (ता.२९) रात्री साडे अकराच्या सुमारास उघडकीस आली. अनोळखी खून्यानी गिरीश यांच्या डोक्यात, कपाळावर टॉमीचे जोरदार प्रहार केले. तसेच त्यांच्या पोटाच्या डाव्या व उजव्या बाजूला पोटात चाकूने भोसकले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

कोट
खुनात वापरलेली टॉमी हे हत्यार जप्त केले आहे. घटनास्थळ तसेच परिसरातील मार्ग व आस्थापना येथील सीसीटिव्ही फुटेज, मृत गिरीश यांच्या मोबाईलवर गेल्या काही दिवसात झालेल्या कॉल डिटेल्सच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. त्याआधारे लवकरच संशयितांच्या मुसक्या आवळू.
-एन आर चौखंडे, पोलिस निरीक्षक हुपरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT