कोल्हापूर

डीकेटीई आयटीआयच्या २३ विद्यार्थ्यांची निवड

CD

डीकेटीई आयटीआयच्या २३ विद्यार्थ्यांची निवड
इचलकरंजी, ता. ८ : डीकेटीई संस्थेच्या पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील आयटीआयच्या २३ प्रशिक्षणार्थ्यांची कॉस्टोमेक ग्लोबल कंपनी (चाकण, पुणे) व पाच प्रशिक्षणार्थ्यांची टाटा मोटर्स कंपनी (पुणे) या नामांकित कंपनीतमध्ये निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांची झालेली निवड म्हणजे औद्योगिक प्रशिक्षणातील गुणवत्ता व दर्जा यांचा परिपाक आहे. दर्जेदार औद्योगिक प्रशिक्षणाबरोबरच उत्कृष्ट प्लेसमेंटची परंपरा आयटीआयने सुद्धा जपली असल्याचे मनोगत संस्थेच्या मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे यांनी व्यक्त केले. येथे घडणारा प्रत्येक विद्यार्थी हा औद्योगिक प्रशिक्षणाबरोबरच उद्योगांना आवश्यक असणाऱ्या गुणवत्तेने परिपूर्ण होतो. यामुळेच औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सातत्याने नामांकित कंपनीमध्ये निवड होत असल्याचे प्राचार्य धन्यकुमार पाटील यांनी सांगितले.
संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे, संचालक मंडळाचे सहकार्य लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकचे प्राचार्य ए. पी. कोथळी, आयटीआयचे प्राचार्य पाटील, टीपीओ व्ही. आर. मुल्लाणी यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT