कोल्हापूर

आज वस्त्रोद्योग धोरण जाहीर होणार

CD

राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाबाबत उत्सुकता

नवे धोरण आज जाहीर होण्याची शक्यताः प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीसमोर


इचलकरंजी, ता.२९: राज्याचे नवीन वस्त्रोद्योग धोरण उद्या (मंगळवार) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा प्रस्ताव आज मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर केला. या नव्या धोरणातून वस्त्रोद्योगातील कोणकोणत्या घटकांना दिलासा मिळणार, याबाबत राज्यातील संपूर्ण वस्त्रोद्योगाचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्र राज्यासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वस्त्रोद्योग धोरणाची मुदत गेल्या ३१ मार्च रोजी संपली आहे. नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच एक तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्यासह राज्यातील वस्त्रोद्योग केंद्रातील अनेक तज्ज्ञांचा समावेश होता. नागपूर वस्त्रोद्योग आयुक्त हे या समितीचे अध्यक्ष होते. या समितीतील सदस्यांनी अनेक महत्वपूर्ण सूचना समिती अध्यक्ष तथा वस्त्रोद्योग आयुक्तांकडे केल्या होत्या.
दरम्यान, नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर होईपर्यंत जुन्या वस्त्रोद्योग धोरणाला शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे नविन वस्त्रोद्योग धोरण कधी जाहीर होणार याकडे वस्त्रोद्योजकांचे डोळे लागले होते. काही दिवसांपूर्वीच समितीचे अध्यक्ष तथा वस्त्रोद्योग आयुक्तांची बदली झाली होती. त्यामुळे नवे धोरण लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तथापि, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील व वस्त्र विभागाच्या सचिवांनी तातडीने नवीन वस्त्रोद्योग धोरण मंजुरीसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर केले आहे. त्यामुळे उद्या (मंगळवार) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन वस्त्रोद्योग धोरणात कोणकोणत्या नविन सवलती मिळणार, कोणत्या जुन्या सवलती बंद होणार, कोणते महत्त्वाचे निर्णय होणार, याबद्दल उत्सुकता आहे. मुळात सध्या वस्त्रोद्योग अनंत अडचणीतून जात आहे. यातून बाहेर पडून वस्त्रोद्योगाला गती मिळण्यासाठी नव्या धोरणातून बूस्टर डोस मिळणार काय, याबाबतही उत्सुकता लागून राहिली आहे. राज्यातील इचलकरंजीसह भिवंडी, मालेगाव, विटा आदी वस्त्रोद्योग केंद्रातून या नव्या धोरणाच्या मंजुरीकडे विशेष लक्ष लागले आहे.
....
कोट
‘वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील हे चांगले वस्त्रोद्योग धोरण जाहीर करतील, अशी आशा आहे. वस्त्रोगातील यंत्रमाग उद्योग, प्रोसेस, सायझिंग, सूतगिरण्या आदी घटक अडचणीत आहेत. त्यामुळे या घटकांना नव्या धोरणातून दिलासा मिळेल व पुन्हा वस्त्रोद्योगाला अच्छे दिन येतील.’

अशोक स्वामी, अध्यक्ष, वस्त्रोद्योग महासंघ, महाराष्ट्र राज्य
...
चौकट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT