कोल्हापूर

पंचगंगा नदीघाट परिसर स्वच्छता

CD

01984

पंचगंगा नदीघाट परिसरात
इचलकरंजीत स्वच्छता मोहीम


इचलकरंजी, ता. ११ : येथील पंचगंगा नदीघाट परिसराची आज महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नदीपात्र कोरडे पडल्यानंतर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे परिसराला मोठी अवकळा आली होती. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामुळे हा परिसर पुन्हा निर्मळ झाला.
पंचगंगा नदीतील दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झाले होते. भटक्या कुत्र्यांमुळे मृत मासे घाट परिसरात ठिकठिकाणी पडले होते. त्यामुळे दुर्गंधी पसरली होती. तर घाटावर स्वच्छता न केल्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात साचला होता.
याबाबतची पाहणी केल्यानंतर आयुक्त दिवटे यांनी महापालिका घाट परिसराची स्वच्छता करण्याचे आदेश आरोग्य अधिकारी सुनीलदत्त संगेवार यांना दिले होते. त्यानुसार आज सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे घाट परिसरातील अस्वच्छता दूर झाली. परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा व कपड्यांच्या चिंध्या पडल्या होत्या. हा सर्व कचरा यावेळी हटविला. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, विजय पाटील, संजय कांबळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Viral Video : मुंबई मेट्रोची अमेरिकेन महिलेला भुरळ; व्हिडिओ शेअर करत म्हणाली- अमेरिकेने भारताकडून शिकले पाहिजे

Amravati: काँग्रेसच्या नगरसेवकांचे आदेश मोडून मतदान ; विधान परिषद निवडणूक; ४५१ पैकी ४२७ मतदारांनी बजावला हक्क

Latest Marathi News Live Update : राजनाथ सिंह यांच्या हस्ते अत्याधुनिक संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे भूमिपूजन

Nashik Crime: सुटकेस मर्डर मिस्ट्रीचा छडा! घटस्फोटीत प्रेयसीला चारित्र्याच्या संशयावरून संपवलं, आरोपीची दुसरी पत्नी गर्भवती

हरवलेल्या मुलीचं रहस्य की भास? ‘दृश्य अदृश्य’मध्ये उलगडणार थरारक सत्य, पूजा सावंत-अशोक समर्थ यांची दमदार केमिस्ट्री

SCROLL FOR NEXT