कोल्हापूर

आयजीएम कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गोंधळ कायम

CD

आयजीएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गोंधळ कायम
मुदतवाढीच्या आदेशाविना १०९ कर्मचाऱ्यांत संभ्रम; सेवा विस्कळीत होण्याचे संकट
सकाळवृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ९ : आयजीएम रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली न निघाल्याने रुग्णालय प्रशासन, कंत्राटदार कंपनी आणि कर्मचाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. परिणामी, अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या रुग्णालयातील कामकाजावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आयजीएम रुग्णालयासाठी कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट डी एम इंटरप्राईजेस कंपनीकडे होते. संबंधित कंत्राटाचा कालावधी मार्च २०२५ मध्ये संपला होता. त्यानंतर उपसंचालक कार्यालयामार्फत दर तीन महिन्यांनी मुदतवाढ देण्यात येत होती. मात्र, सध्या नवीन मुदतवाढीबाबत अधिकृत आदेश नसल्याने कंपनीने १०९ कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याच्या सूचना दिल्या.
कंपनीच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी काही काळ काम बंद केले. मात्र, रुग्णालयातील दैनंदिन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांना विनंती केली. रुग्णसेवेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुन्हा कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रुग्णालयाचे कामकाज सुरळीत सुरू राहिले.
मात्र, सध्या संबंधित कंत्राटदार कंपनीच्या मुकादमांकडून कर्मचाऱ्यांना मुदतवाढीचा आदेश मिळालेला नसताना काम केल्यास त्याचा पगार कंपनीकडे मागू नये. त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, अशा सूचना दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कर्मचारी संभ्रमात आहेत. काम सुरू ठेवायचे की थांबवायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
एकीकडे रुग्णालय प्रशासन सेवा अबाधित ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन करत आहे. तर दुसरीकडे कंपनी अधिकृत मुदतवाढीशिवाय जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. या परस्परविरोधी भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांची मानसिक अवस्था बिकट झाली आहे.
-----------------
दृष्टिक्षेपात :
- मुदतवाढीचा आदेश नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांत संभ्रम
- सफाई, रुग्णसेवा व सहाय्यक विभागांवर कामाचा ताण वाढणार
- पुन्हा काम बंद केल्यास आरोग्यसेवा विस्कळीत होण्याची भीती
-कंत्राटदार कंपनीकडून पगाराबाबत जबाबदारी नाकारली जात असल्याने तणाव
-रुग्णालयातील दैनंदिन सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाची धावपळ
--
कोट
कंत्राटाची मुदत वाढ न मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुदतवाढ मिळाल्यानंतर सेवा सुरळीत ठेवणे शक्य होणार आहे.
- शरद पाटील, व्यवस्थापक डी. एम. एंटरप्रायझेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात रात्रभर पावसाची संततधार, अनेक भागांत साचले पाणी; वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त, वाहनांच्या लागल्या रांगा

Sonvi Bridge Accident in Sangameshwar : सोनवी पुलावर दोन ट्रकची धडक; एकाच मार्गिकेतून दुहेरी वाहतुकीचा फटका; महामार्गावर वाहनांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे ढग; पुढील काही तास पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता

Mumbai Rain Update: इस्ट टू वेस्ट! वाहतूक कोंडीने मुंबईकर त्रस्त; रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

SCROLL FOR NEXT