कोल्हापूर

भंगारातून महापालिका मालामाल

CD

03369
इचलकरंजी : गॅरेज परिसरात कालबाह्य वाहने उभी करण्यात आली आहेत.
--
भंगार विक्रीतून महापालिका मालामाल
इचलकरंजीत १६ कालबाह्य वाहनांचा लिलाव; ई-लिलावातून २६ लाखांवर मिळाला महसूल
--
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० : महापालिकेच्या गॅरेजमध्ये धूळ खात पडून असलेल्या १६ कालबाह्य वाहनांनी इचलकरंजी महापालिकेच्या तिजोरीत लाखोंची भर घातली. स्क्रॅप म्हणून १६ लाख रुपये मिळतील, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मात्र, ई-लिलाव प्रक्रियेत या वाहनांना तब्बल २६ लाखांहून अधिक किंमत मिळाली. महापालिकेला अपेक्षेपेक्षा अधिक लाभ झाला आहे. भंगारातून महापालिका मालामाल झाली.
महापालिकेच्या वाहन विभागातील १५ वर्षांहून अधिक आयुर्मान पूर्ण झालेली ही वाहने मागील दोन ते तीन वर्षांपासून विनावापर पडून होती. केंद्र शासनाच्या ‘आरव्हीएसएफ’ धोरणानुसार ही वाहने स्क्रॅपसाठी पात्र ठरली होती. मात्र, प्रशासकीय प्रक्रिया, केंद्रीय टेंडरिंगमधील विलंब आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील कार्यवाही रखडल्याने हा विषय प्रलंबित होता. अखेर प्रशासनाने पुढाकार घेत राज्य परिवहन आयुक्तांकडे ई-लिलावासाठी परवानगी मागितली. त्यानुसार मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएसटीसी) मुंबई यांच्या माध्यमातून ई-ऑक्शन प्रक्रिया राबविली.
महापालिकेला एमएसटीसीकडून विशेष सेलर लॉग-इन आयडी उपलब्ध करून दिला होता. अधिकृत सरकारी मूल्यांकन संस्थेमार्फत वाहनांचे मूल्यांकन करून किमान किंमत निश्चित केली. सुरुवातीला १६ लाखांपर्यंत महसूल अपेक्षित होता. प्रत्यक्ष ई-लिलावात स्पर्धात्मक बोली लागल्याने २६ लाखांहून अधिकवर पोहोचली. यामुळे महापालिकेला आर्थिक लाभांसोबत गॅरेज परिसरातील अडविलेली जागाही मोकळी होणार आहे. परिणामी, नव्या वाहनांच्या पार्किंगसह वाहन विभागाची कार्यक्षमताही वाढण्यास मदत होणार आहे.
-----------------------------

दृष्टिक्षेपात
- अंदाजित स्क्रॅप मूल्य - १६ लाख
- प्रत्यक्ष ई-लिलाव महसूल - २६ लाखांवर
- अतिरिक्त आर्थिक लाभ - १० लाखांपेक्षा जास्त
- ‘एमएसटीसी’मार्फत पारदर्शक ई-ऑक्शन प्रक्रिया
-------------

तिहेरी लाभ
- महापालिकेला आर्थिक उत्पन्न
- गॅरेज परिसरातील अडथळा दूर
- नवीन वाहनांसाठी प्रशस्त जागा उपलब्ध होणार
- वाहन विभागाची कार्यक्षमता वाढणार
---------------
‘एमएसटीसी’मार्फत प्रक्रिया
नगरपरिषदेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर वाहन विभागात नव्या वाहनांची सातत्याने भर पडू लागली. आगामी काळात आणखी वाहनांची खरेदी होण्याची शक्यता असल्याने जुन्या व निष्क्रिय वाहनांचा प्रश्न सोडविणे अत्यावश्यक होते. प्रशासनाने पुढाकार घेत राज्य परिवहन आयुक्तांकडे ई-लिलावासाठी परवानगी मागितली. त्यानुसार मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएसटीसी), मुंबई यांच्या माध्यमातून ई-ऑक्शन प्रक्रिया राबविली.

०३३६९
ICH26B03369

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन गरजेनुसार वापरा, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; देशहितासाठी PM मोदींचं आवाहन

RCB vs MI Live: भुवनेश्वर कुमारचा दरारा... रोहित शर्मा, सूर्याला दोन चेंडूंत गुंडाळले; पर्पल कॅप नावावर अन् मोठा विक्रम Video

दहावीला शाळेत पहिला नंबर आला, विद्यार्थीनीचा सत्कार करायला घरी गेले; कौतुक करतानाच शिक्षकाचा मृत्यू

IPL 2026 Point Table: उर्विल पटेलची ऐतिहासिक खेळी! CSK ची मोठी झेप अन् लखनौ सुपर जायंट्स प्ले ऑफच्या शर्यतीतून OUT

महिला आणि बाल विकास विभागातील कामं डिजिटल होणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT