कोल्हापूर

ईश्वरपूर : अपघात, एक ठार

CD

रेठरे धरण येथे अपघातात
कोल्हापूरचा एक ठार

ईश्वरपूर, ता. ९ : रेठरे धरण (ता. वाळवा) गावच्या हद्दीत आज सायंकाळी झालेल्या दुचाकी व चारचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. प्रदीप खंडेराव कांबळे (वय ५०, रा. सुभेदार रामजी आंबेडकर कॉलनी, विचारे माळ, कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कौस्तुभ वसंत वाईकर (रा. कोल्हापूर) यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रदीप कांबळे हे ईश्वरपूर येथे भूमिअभिलेख कार्यालयात कामास आहेत. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून (एमएच ०९ डीटी २५१६) ईश्वरपूरहून शिराळ्याकडे जात होते. रेठरे धरण गावच्या हद्दीतील ओढ्यावरच्या पुलाजवळ समोरून येणाऱ्या चारचाकी (एमएच ०९ जीएम १३७८) वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ईश्वरपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अपघाताची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीन लोकांसाठी पाकिस्तान मागतोय शांततेचा नोबल पुरस्कार, शहबाज शरीफ अन् आसिम मुनीरनंतर ती तिसरा व्यक्ती कोण?

Ambedkar Jayanti: बाबासाहेबांच्या पुतळ्यांवर आता मानाचे 'छत्र'! CM योगींची मोठी घोषणा; राज्यातील आंबेडकर पार्कांचेही होणार सौंदर्यीकरण!

Karnataka 2nd PUC Result 2026 : 'बारावी'चा विक्रमी 86.48 टक्के निकाल; उडुपी जिल्हा राज्यात अव्वल; चिक्कोडी 24 व्या, तर बेळगाव 26 व्या स्थानावर

LPG Gas Cylinder : एलपीजी गॅस सिलिंडरधारकांसाठी आनंदाची बातमी ! बुकिंग आणि डिलिव्हरीबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय

आर माधवनने ओसाड रानात फुलवली नारळाची बाग, अनुभव सांगताना म्हणालेला...' प्रवासातील प्रत्येक गोष्ट '

SCROLL FOR NEXT