कोल्हापूर

निवृत्त शिक्षकांचे समाजासाठी योगदान श्रेष्ठ

CD

ich225.jpg
84532
इचलकरंजी : निवृत्त प्राथमिक शिक्षक वेल्‍फेअर असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात वयाची ७५ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचा अलका स्वामी यांच्याहस्ते सत्कार केला.
-------------
निवृत्त शिक्षकांचे समाजासाठी योगदान श्रेष्ठ
अलका स्वामी; इचलकरंजीत ७५ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कार
इचलकरंजी, ता. २२ : निवृत्त शिक्षकांनी सेवेत असताना विद्यार्थ्यांवर संस्कार करून कष्टाची किंमत बिंबवली आहे. विद्यार्थ्यांना स्वप्नांची दिशा दाखवत आदर्श नागरिक घडवले आहेत. सेवेतून मुक्त झाल्यानंतरही ते आज समाजाची सेवा करत आहेत. या निवृत्त शिक्षकांचे योगदान समाजासाठी श्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी केले.
येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक वेल्‍फेअर असोसिएशनतर्फे आयोजित वयाची ७५ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. सदाशिव पाटील, महादेव लंबे, सौ. प्रेमला डकरे, सुनंदा कुंभार, गणपती कांबळे, अमीर मुल्लानी, श्रीमती शालिनी पाटील, रोहिणी बन्ने, के. एस. पाटील, खुतबुद्धीन अत्तार, श्रीमती आनंदी आवळे, इंदुमती मट्टीकल्ली, जयश्री नवांगुळ या निवृत्त शिक्षकांचा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला.
असोसिशनचे अध्यक्ष नारायण केकले यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. बाबासो कोळी, शंकरराव कांबळे, महादेव लंबे, मारुती गुरव, शिवाजी आडके, के. डी. कांबळे, मालती कोळी, श्रीमंती चौगुले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख उपाध्यक्ष नारायण कुंभार यांनी केले. स्वागत वेणुताई कुडचे यांनी केले. आभार श्रीकांत दौंडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs PBKS Weather: 'कालबैसाखी’ने नाइट रायडर्सचे टेंशन वाढवले; कोलकाताहून Live अपडेट्स, कट ऑफ टाईम अन् नियम Explain

'धनंजय माने...' नाटकानंतर बऱ्याच वर्षांनी प्रिया बेर्डेंचा रंगभूमीवर दमदार कमबॅक ! या दिवशी होणार शुभारंभ

IPL 2026 तिकिट खरेदी करताय, सावध व्हा! २५ वर्षीय युवकाने आईच्या अकाऊंटमधून RCB vs CSK मॅच तिकीटासाठी लाखो रुपये पाठवले अन्...

Mumbai News : मध्य-पूर्वेतील युद्धाचे सावट; मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला ग्रहण, सेवा किमान महिनाभर ठप्प

Latest Marathi News Live Update: अजूनही निवडणूक बिनविरोध होऊ शकते- चंद्रकांत पाटील

SCROLL FOR NEXT