कोल्हापूर

इचलकरंजीत ‘स्वाभिमानी’ तर्फे ठिय्या

CD

05824
इचलकरंजी : पीएम किसान योजनेच्या चुकीच्या धोरणाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले.
-----------
इचलकरंजीत ‘स्वाभिमानी’ तर्फे ठिय्या
पीएम किसान योजना; अप्पर तहसील कार्यालयासमोर आंदोलन
इचलकरंजी, ता. १३ : पीएम किसान योजनेच्या चुकीच्या धोरणाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सुमारे तासभर प्रवेशद्वारातच ठिय्या मारला.
वारंवार मागणी, निवेदने देऊनही प्रलंबित कामाचा निपटारा न करता पीएम किसान योजनेत चुकीचे धोरणे अवलंबले जात आहेत, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. पीएम किसान योजनेच्या कामाचा योग्य निपटारा न झाल्यास कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.
येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पीएम किसान योजने संबंधित वेळोवेळी तक्रारी अप्पर कार्यालयात दाखल केल्या होत्या. १४१ लाभार्थ्यांचे अनुदान बंद झाले होते व त्याची यादीही दिली होती. मात्र यातील त्रुटी आणि अनुदान का मिळत नाही याचा खुलासा अद्याप केला नाही. तसेच सातबारा उतारा असूनही अनेकांची नावे योजनेतून वगळली आहेत. महा-ई-सेवा केंद्र शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करत आहे. तसेच नवीन नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. यासंबंधी मागण्याचे लेखी निवेदन काही दिवसांपूर्वी कार्यालयात दिले होते. याबाबत नियोजन करून कामे न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अप्पर तहसील कार्यालयासमोर मागण्यासाठी ठिय्या मांडला. तासभर प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर बसून शासनाचा निषेध करत जोरजोरात घोषणाबाजी केली.
पीएम किसान योजनेबाबत महसूल कार्यालयाकडून कृषी खात्याकडे बोट दाखवले जाते. मात्र कृषी विभाग आदेश नसल्याचे सांगत काम करण्यास नकार देत आहे. अशाप्रकारे प्रशासन जबाबदारी टाळत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. मागणीचे निवेदन अव्वल कारकून सुरेखा पोळ यांनी स्वीकारले. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा निपटारा होत असून काही दिवसात सर्व कामे मार्गी लागतील, असे आश्वासन सौ. पोळ यांनी दिले. कामाचा समाधानकारक निपटारा न झाल्यास कार्यालयासमोरच बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बसगोंडा बिरादार, उपाध्यक्ष अण्णासाहेब शहापुरे, सतीश मगदूम, विश्वास बालिघाटे, बाळासाहेब पाटील, आर.के.पाटील, चिदानंद पाटील, विष्णू साळुंखे, रामा शेळके, बापू कोळेकर, शामराव येलाज, सदाशिव मिरजे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT