कोल्हापूर

संशयास्पद मृत्यू गोंधळ

CD

6051

इचलकरंजी : संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी विरोध केला.
...

इचलकरंजीत रुग्णाच्या
मृत्यूनंतर नातेवाईकांचा गोंधळ

इचलकरंजी, ता.१० : उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने येथील एका मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात नातेवाईकांनी गोंधळ घातला. सुरज कुमार आवटी (वय ३२, रा. अब्दुललाट ता. शिरोळ) याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यासह विच्छेदनासाठी नातेवाईकांनी विरोध केला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तणावाचे वातावरण निवळले. मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासह आयजीएम रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरज आवटी यांना मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी येथील एका मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आवटी यांची प्रकृती गंभीर बनल्याने तपासण्या झाल्यानंतरच शस्त्रक्रियेचा निर्णय घेता येईल, असे रुग्णालयात व्यवस्थापनाकडून रुग्णाच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. मात्र आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नातेवाईक संतापले. रुग्णाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घातला. यावेळी मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केल्याने तणावाचे वातावरण बनले. याबाबत माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस दाखल झाले. नातेवाईक व रुग्णालय प्रशासनाची बाजू ऐकून घेतली आणि पोलिसांनी नातेवाईकांना शांत केले. मृतदेह आयजीएम रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोंधळ झाला. नातेवाईकांनी आयजीएम रुग्णालयात गर्दी केल्याने पोलिसांनी त्यांची समजूत काढली.सुरज याचा मृत्यू झाल्याची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.शवविच्छेदनाचा अहवाल राखून ठेवण्यात आला आहे.
--------
जिल्हाशल्यचिकित्सांकडे अहवाल पाठवणार

‘नातेवाईकांच्या आरोपानंतर संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून मृत रुग्णावर केलेल्या उपचाराचा अहवाल घेण्यात आला आहे.तसेच नातेवाईकांचे जबाब घेतले जातील. शवविच्छेदनासह हा एकत्रित अहवाल जिल्हा शल्यचिकित्सांकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर या समितीच्या निर्णयानुसार योग्य ती करवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT