कोल्हापूर

खंडणी गुन्हा

CD

सामाजिक कार्यकर्ता दामलेवर
इचलकरंजीत खंडणीचा गुन्हा

इचलकरंजी, ता.१० : आपल्या बळाचा वापर करत व्यापारी कुटुंबाला त्रास देत खंडणी मागणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रसाद प्रभाकर दामले (वय ५३, रा. इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद धनश्री वामन मुळ्ये( वय ४२) यांनी पोलिसांत दिली आहे,अशी माहिती पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी दिली. मात्र पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धनश्री मुळये यांचा घरासमोर फळ विक्रीचा व्यवसाय आहे. सामाजिक कार्यकर्ते दामले हा त्यांच्या घरासमोर येऊन फळ विक्री व्यवसायाचा फोटो काढत होता. याबाबत मुळये यांच्या पतीने विचारणा केली असता त्यांना महानगरपालिकेत तक्रार करून फळ विक्रीचा व्यवसाय करून देणार, अशी धमकी दिली. तसेच व्यवसाय करायचा असेल तर दहा हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी करत धक्काबुक्की केली. वाद सोडवण्यासाठी आलेल्या मुलगा श्रीराम याच्या पायावर दगडाने मारहाण केली. या मारहाणीत तो जखमी झाला आहे. यावेळी आसपासच्या व्यापाऱ्यांनी गर्दी केली. सर्वांनी दामले यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या सर्वांना व्यापार कसा करता तेच बघतो अशी धमकी देत दमदाटी केली. ही घटना व्यंकोबा मैदान परिसरात घडली. फिर्यादीनुसार दामले याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT