कोल्हापूर

धूर सोडणारी वाहने सुसाट

CD

06071, 06072
फोटो - संग्रहित

धूर सोडणारी वाहने सुसाट
विनापीयुसी शेकडो वाहने रस्त्यावर; प्रदूषणात भरच
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.१२ : जिल्ह्यात जलप्रदूषणाचा प्रश्न जटील बनला असताना मार्गावर शेकडो गाड्या पीयूसीविना धावत आहेत. वाहनांमधून निघणारा धूर व या धुरामुळे होणाऱ्या वायु प्रदूषणाला आळा घालण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने वाहनचालकांना वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढण्याच्या सूचना दिल्या आहेत; मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. पीयूसी नसलेल्या वाहनांचा धूर प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असून धूर सोडणारी वाहने सुसाट आहेत.
लोकसंख्येएवढीच वाहने सध्या रस्त्यावर धावताना दिसत आहेत. या वाहनांमधून कार्बन मोनाक्साईड, हायड्रोकार्बन असे विषारी वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर सोडले जातात. त्यास लगाम लावण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना पीयूसी बंधनकारक केले आहे. पर्यावरणाला धोकादायक ठरेल एवढ्या प्रमाणात विषारी वायू वाहनांमधून बाहेर पडत नाही ना, हे पाहणे हा पीयूसीचा उद्देश आहे. मात्र पीयूसी म्हणजे केवळ दंड वाचवण्याचे साधन झाले असून, ते देणाऱ्या यंत्रणांकडूनही गांभीर्याने तपासणी केली जात नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.
योग्य काळजी व दुरुस्तीअभावी प्रदूषण करणाऱ्या वाहनांना सहज फिटनेस सर्टिफिकेट मिळते, त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या अशा नादुरुस्त वाहनांमुळे शहराच्या प्रदूषणात वाढ होत आहे. अशा वाहनांसाठी नियम बनवले आहेत, मात्र याबाबत फारसे कोणी गंभीर नाही. त्यामुळे बाहेरून आकर्षक दिसणारी वाहने रस्त्यावर धावताना काळा धूर सोडत आहेत. या वाहनांमुळे हवेचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. या वायू प्रदूषणाचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.
----
कारवाई थंडावली
आरटीओकडून पीयूसी नसलेल्या वाहनांवर नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार नियमित कारवाई करणे अनिवार्य आहे; मात्र जिल्ह्यात या विभागाची दंडात्मक कारवाई थंडावली आहे. सर्वाधिक विनापीयूसी वाहने शहरासह ग्रामीण भागात आहेत.
---
काय आहे नियम
केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ नुसार, प्रत्येक मोटार वाहनासाठी (बीएस १, बीएस २, बीएस ३, बीएस ४ तसेच सीएनजी व एलपीजी वाहने) वैध पीयूसी आवश्यक आहे. चारचाकी बीएस ४ वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्राची वैधता एक वर्षाची, तर इतर वाहनांसाठी तीन महिन्यांची आहे.
----
जिल्हा पीयूसी स्थिती
मार्चअखेर पीयूसी वाहने - २३ हजार ९१६
एकूण पीयूसी केंद्रे - १००
एकूण वाहने - १६ लाख ९४ हजार ६३४
--------
वाहन संख्या दृष्टीक्षेपात
वाहन प्रकार* एकूण
दुचाकी * १३३२४१५
मोटार कार * १६७२०५
जीप/ओमिनी बस * २१२६७
ऑटोरिक्षा * १९७४०
ट्रक व लॉरी * १९४७७
मालवाहतूक (चारचाकी) * २९४२४
मालवाहतूक (तीनचाकी) * ११७५८
ट्रॅक्टर* ४७३५५
ट्रेलर*३३५४६
इतर * ४०५०
-----
कोट
प्रत्येक वाहनास पीयूसी प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे. पीयूसी करण्यासाठी किरकोळ रक्कम आहे. पण पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर दंडात्मक कारवाई दोन हजारांच्या घरात आहे. वाहनधारकांनी वाहनांची काळजी घेवून प्रदूषण रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे.
-रोहित काटकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT