कोल्हापूर

तोरणानगर परिसरात घाणीचे साम्राज्य

CD

06124
इचलकरंजी : येथील तोरणानगर परिसरात गटारीत कचरा साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
----------
तोरणानगर परिसरात घाणीचे साम्राज्य
नागरिकांचे आरोग्य धोक्यात; महापालिकेने लक्ष देण्याची मागणी
इचलकरंजी, ता. २० : शहरालगत असलेल्या तोरणानगर परिसरात घाणीचे साम्राज्य वाढत चालले आहे. दोन महिन्यांपासून गटारातील कचरा तसाच आहे. अनेक ठिकाणी गटारीत कचरा साचून सांडपाणी तुंबून राहिले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून महापालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
तोरणानगर परिसरात सुमारे चार हजारहून अधिक नागरी वस्ती आहे. अनेक राजकीय बदल झाले तरीही या भागाची परिस्थ‌िती अद्यापही बदललेली नाही. सध्या येथे आरोग्याच्या समस्या बिकट बनल्या आहेत. दोन महिन्यांपासून गटारी स्वच्छ न केल्याने गटारीत मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहिला आहे. साचलेल्या गटारीतून मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. शिवाय रस्त्याबरोबर असणाऱ्या अनेक घरात हे सांडपाणी शिरत आहे. याबाबत महापालिकेला वारंवार सांगण्यात आले. तरीदेखील कचरा व गटारी साफ करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. गटारातील घाणीच्या साम्राज्यासह मोकाट प्राण्यांचाही उपद्रव वाढला आहे. याचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत होत आहे. भागातील गटारी स्वच्छ करण्यासह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
-----
दोन महिन्यापासून गटारी साफ केल्या नाहीत. वारंवार महापालिकेला कळवूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. घाणीमुळे साथीचे आजार बळावत असून भागातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
-विजय यड्रावे, नागरीक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT