कोल्हापूर

प्रोबस क्लबमध्ये व्याख्यान

CD

06372
इचलकरंजी : प्रोबस क्लबमध्ये आयोजित प्रबोधनपर व्याख्यानात संजीव कुलकर्णी यांचे स्वागत केले.

प्रोबस क्लबमध्ये व्याख्यान
इचलकरंजी : रोटरी प्रोबस क्लबमध्ये आत्मदर्शन परिवाराचे संजीव कुलकर्णी गुरुजी यांचे प्रबोधनपर व्याख्यान झाले. सद्यस्थितीत आपण आनंदी कसे रहावे, योग, ध्यानधारणा, चिंतन, मनन याचे महत्त्व सोदाहरण समजावून सांगितले. विठ्ठलराव डाके, शसुकुमार चौगुले पुष्पा मोरे उज्वला गोंधळी आदींनी मनोगत व्यक्त केले. सविता मकोटे, प्रकाश रावळ यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व ओळख प्रोग्रॅम कमिटी चेअरमन रवींद्र सौंदत्तीकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष, धोंडीराम कस्तुरे, अध्यक्ष भिमराव मोरे, सचिव श्री टारे आदींनी परिश्रम घेतले.
-----------
स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले. जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहात त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण केला. कामगार अधिकारी विजय राजापुरे, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, कनिष्ठ अभियंता बाजी कांबळे, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, मारुती जाधव आदी उपस्थित होते .
------------
बाबासाहेब खंजिरे यांचा स्मृतिदिन
इचलकरंजी : येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेत बाबासाहेब खंजिरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र कोष्टी समाजाचे अध्यक्ष प्रकाश सातपुते यांच्याहस्ते करण्यात आले. भाऊसाहेब खंजिरे यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये केलेल्या कार्याची व इचलकरंजीच्या विकासामध्ये दिलेले योगदान या कार्याला उजाळा श्री. सातपुते यांनी दिला. संस्थेचे चेअरमन अरुण खंजिरे, प्राचार्य पुरंधर नारे, मुख्याध्यापक एस. ए. पाटील आदी उपस्थित होते. देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमही राबवले जात आहेत.
-----
पंडीत नेहरूंना अभिवादन
इचलकरंजी : महानगरपालिकेतर्फे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन झाला. जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेस प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण केला. नितिन बनगे, सदाशिव शिंदे, महाराष्ट्र सुरक्षा बल पर्यवेक्षक उमाजी कणसे, मारुती जाधव, सचिन शेडबाळे, चंद्रकांत साळी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT