कोल्हापूर

सुधारित गुन्हेगार दत्तक

CD

06416
इचलकरंजी : जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांनी पोलिस ठाण्यांना भेटी देत कामाचा आढावा घेतला.
...

इचलकरंजीत गुन्हेगार
दत्तक योजना राबवणार

जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांची माहिती

इचलकरंजी, ता.२: ‘शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना जबाबदारपूर्वक राबविण्यात येणार आहे. यामुळे पोलिसांचे वैयक्तिकरित्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कायम लक्ष राहणार असून वाढणाऱ्या गुन्हेगारीचा आलेख लवकरच कमी होईल. इचलकरंजी विभागात याची त्वरित अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महेंद्र पंडित यांनी आज इचलकरंजी शहराला भेट दिली. त्यांनी कलानगर येथील उभारण्यात येत असलेल्या पोलिस वसाहतीच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर शिवाजीनगर, गावभाग, शहापूर पोलिस ठाण्यांना भेटी देत कामाचा आढावा घेतला. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर उपाययोजना करण्याबाबत संबधित पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शहरात वाढत्या गुन्ह्यांबरोबर पोलिस कर्मचारी वाढवण्याची गरज आहे.त्यामुळे पोलिस ठाण्यांना पुरेसे मनुष्यबळ देण्यात येणार आहे. गुन्हे उघडकीस येण्यासाठी शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्यासह गरजेच्या ठिकाणीही सीसीटीव्ही लावण्यात येतील. तसेच पोलिस ठाण्यात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, शिवाजीनगरचे निरीक्षक सत्यवान हाके, वाहतूक शाखचे विकास अडसूळ यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT