कोल्हापूर

व्यापारी न्यायालय शिक्षा

CD

बनावट बिलाबद्दल
व्‍यापाऱ्यास कारावास
इचलकरंजी, ता. ६ : बनावट खरेदी विक्रीची बिले देवून शासनाच्या दीड कोटी रुपये महसूलाची हानी करणाऱ्या येथील व्यापाऱ्याला न्यायालयाने सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. श्याम भवरलाल अरोरा (रा. खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेट इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यानी त्याला दोषी ठरवले. एक वर्षाची सक्त कारावासाची शिक्षा व प्रत्येक कलमासाठी ५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने अतिरिक्त सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली.
२०१६ मध्ये जीएसटी भवन (पूर्वीचे विक्रीकर भवन) या कार्यालयाने बनावट खरेदी विक्री बिले देवून शासनाची दीड कोटींची महसूल हानी केल्याबद्दल येथील व्यापारी श्याम अरोरा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याचा निकाल येथील प्रथम वर्ग न्यायालयातील न्यायदंडाधिकारी यांनी दिला. त्यानुसार अरोरा याला फौजदारी प्रक्रिया सहिता कलम तसेच महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा-२००२ च्या विविध कलमान्वये दोषी ठरवले. या प्रकरणाच्या अनुषंगाने कोल्हापूर विभागाच्या राज्यकर सहआयुक्त सुनिता थोरात यांनी अशा प्रकारच्या बनावट खरेदी विक्रीची बिले देवून शासनाची महसूल हानी करणा-या व्यापा-यांवर यापुढेही कडक कारवाई चालू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT