कोल्हापूर

तुंबलेल्या गटारी होताहेत मोकळ्या

CD

15473
इचलकरंजी : गटारी, नाले सफाईचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केले.
06687
प्रसिद्ध झालेले फोटोफीचर

लोगो- सकाळ इम्पॅक्ट
---------
तुंबलेल्या गटारी होताहेत मोकळ्या
इचलकरंजी महापालिकेकडून गटारी, नालेसफाई सुरू; नागरिकांतून समाधान
इचलकरंजी, ता.११ : भर पावसाळ्यात शहरातील गटारी तुंबल्याने सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. गंभीरतेकडे प्रकाश टाकत ‘सकाळ''मधून याला जबाबदार कोण? हे फोटोफीचर प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत आज दुसऱ्या दिवशी गटारी, नाले सफाईचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे आता तुंबलेल्या गटारी मोकळ्या होत असून तातडीने मागणी पूर्ण झाल्याने भागातील नागरीकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
शहरात नाले, गटारीतून सांडपाणी पाणी जायला पुढे मार्गच नसल्याने पाणी तुंबून राहिले होते. अनेक महिन्यांपासून महापालिकेचे गटारी साफ करण्याकडे दुर्लक्ष होते. ऐन पावसाळ्यात मात्र हा प्रश्न नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर बनला होता. घरातून बाहेर पडलेल्या सांडपाण्यासह प्लास्टिक कचरा जागीच थांबून राहिला होता. नागरिकांचा त्रास वाढत दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. याबाबत महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही गटारी सफाईकडे पाठ फिरवली जात होती. या गंभीर प्रश्नाला ‘सकाळ’ने वाचा फोडली. शहराच्या विविध भागातील तुंबलेल्या गटारीचे फोटोफीचर प्रसिद्ध केले.
फोटोफीचर प्रसिद्ध होताच आज महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतली. कर्मचाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. दिवस उजाडताच आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांडपाणी जाण्यासाठी मार्ग काढण्यास सुरुवात केली. तुंबलेल्या गटारी स्वच्छ करत साचलेला कचरा गटारी बाहेर काढला आणि थांबून राहिलेल्या सांडपाण्याला वाट करून दिली. यामध्ये सर्वाधिक प्लास्टिक बाटल्या, पिशव्या थर्माकोल कचरा आढळून आला.
-----------
गटारीत नको, घंटागाडीत टाका
गटारी सफाईत सर्वाधिक घरगुती व हॉटेलमधील कचरा आढळून आला. यातून नागरिकांनी योग्य खबरदारी घेतली नसल्याचे दिसले. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची सुरक्षा जपत नागरिकांनी कचऱ्याची विल्हेवाट लावायला हवी. घरातील, हॉटेलमधील थेट गटारीत जाणारा कचरा घंटागाडीत टाकला तरच आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT