कोल्हापूर

इचलकरंजीत शाळांना तंबाखूचा वेढा

CD

07010
संग्रहित

इचलकरंजीत शाळांना तंबाखूचा वेढा
निर्भया पथकाच्या कारवाईतून स्पष्ट ः आदेश धुडाकावून पानटपऱ्यांतून सर्रास विक्री

ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.२१ : शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास मनाई आहे. मात्र शहरात अनेक शाळा, महाविद्यालय परिसरात पानटपऱ्यांतून मनाई आदेश धुडकावून तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री केली जात आहे. निर्भया पथकाने शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात केलेल्या कारवाईनंतर ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. ही बाब मात्र विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
सिगारेट-तंबाखूमुळे कर्करोगाचा धोका सातत्याने वाढता असल्याने शाळा-महाविद्यालयापासून शंभर मीटर परिसरात तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर कायदेशीर निर्बंध आहेत. तरीही अनेक शाळा, महाविद्यालय परिसरात पानपट्टी आणि किरकोळ विक्रेत्यांकडून राजरोसपणे तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री केली जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. शाळा परिसरात अशा पदार्थांच्या विक्रीमुळे विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होत आहेत. अशा विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी होत असताना आता याविरोधात निर्भया पथक ॲक्शन मोडवर आले आहे.
शाळा, महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील पानटपऱ्या निर्भया पथकाने लक्ष्य केल्या आहेत. रोडरोमिओ, टवाळखोरांवर कारवाई करत असताना पानटपऱ्यावरही धडक कारवाई केली जात आहे. काही शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोरच पानटपऱ्या थाटल्या आहेत. येथे शाळेत येता - जाता, मधल्या वेळेत विद्यार्थी सहज जात आहेत. तसेच या पानटपऱ्यावर शाळेच्या वेळेतच तरुणांचे घोळकेच्या घोळकेच दिसत आहेत. प्रत्येक शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असलेले फलक लावले आहेत. मात्र याची अंमलबजावणी आतापर्यंत ना प्रशासनाकडून करण्यात आली. ना शाळा, महाविद्यालयांकडून. आता पानटपऱ्याचा उपद्रव वाढल्याने पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. कारवाईमुळे मात्र शहरातील शाळा महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातच तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या पानटपऱ्या सुरू असल्याचे वास्तव समोर आले.
-----------
विद्यार्थ्यांसमोर पिचकाऱ्यांचा सडा
पानविक्रेत्याकडे सिगारेट, पान, मावा व तंबाखूजन्य पदार्थ मिळतात. हे खायला दूरवरून लोक येतात. तरुणांची टोळकीही येथे पान खाण्यासाठी नेहमी येताना दिसतात. अशी दुकाने शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात आहेत. येथे पिचकाऱ्यांचा सडाही नेहमीच पडलेला दिसतो. परिणामी विद्यार्थी संसर्गजन्य रोगांनाही बळी पडण्याची भीती आहे. यामुळे केंद्र शासनाचे तंबाखूमुक्त शाळा धोरणही धोक्यात आले आहे.
-----
विनापरवाना अवैध पानटपऱ्या
पानटपऱ्यांत मटका जुगार कारवाईनंतर अनेकांचा पानटपरी चालवण्याचा परवाना नसल्याचे समोर आले होते. महापालिकेतही किरकोळ पानपट्टीधारकांचीच अधिकृत नोंद आहे. अशा शहरातील विनापरवाना अवैध पानटपऱ्याचा सर्व्हे करण्याची गरज आहे. तरच शाळा महाविद्यालयांसमोर पानटपऱ्यांचे पसरणारे लोन थांबेल आणि विद्यार्थी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहतील.
----
पानटपरी कारवाई (१ ते २० ऑगस्ट)
* पानटपऱ्या - १९
* दंड - ३ हजार ८००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT