कोल्हापूर

बालनाट्य स्पर्धा निकाल

CD

07882
इचलकरंजी : बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना देवल क्लबचा संघ.
...
देवल क्लबचे ‘राखेतून उडाला मोर’ अव्वल

इचलकरंजीत राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा

इचलकरंजी, ता.६ : मराठी बालनाट्य स्पर्धेत ‘राखेतून उडाला मोर’ हे बालनाट्य प्रभावीपणे सादर केलेल्या गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक इंद्रधनु कलाविष्कार संस्था मिरज तर गडहिंग्लज कला अकादमी गडहिंग्लज यांनी तृतीय क्रमांक मिळविला. आजरा हायस्कूल आजराच्या ‘झाडवाली झुंबी’ या बालनाट्यास उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.
येथील अ.भा. मराठी नाट्य परिषद शाखा आणि इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच दि इचलकरंजी को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट यांच्या सहकार्याने ही राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धेचे परीक्षक व रंगकर्मी अरुण पटवर्धन (पुणे), संजय सातपुते (इचलकरंजी), किरणसिंह चव्हाण (कोल्हापूर), मध्यवर्ती नाट्य परिषदेचे संचालक राजन मुठाणे, महानगरपालिकेचे प्रतिनिधी संजय कांबळे, स्पर्धा समन्वयक प्रा. मिलिंद दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारामध्ये असिफ सनदे (देवल क्लब ) यांना दिग्दर्शन प्रथम, धनंजय जोशी (इंद्रधनु कलाविष्कार संस्था मिर यांना द्वितीय आणि शिवाजी पाटील गडहिंग्लज कला अकादमी यांना तृतीय पुरस्कार मिळाला. अभिनय मुले गटात समर्थ गुरव (इंद्रधनु मिरज) याला प्रथम, ध्रुव सावनुरे (देवल क्लब ) याला द्वितीय तर मयुरेश शिंदे (गडहिंग्लज कला अकादमी) याला तृतीय क्रमांक मिळाला. संस्कार नागरगोजे (मिरज), शौर्य घाटगे (पेठवडगाव), अथर्व मुळीक (गवसे), सार्थक काकडे (इचलकरंजी), नेत्रज तळाले (मिरज) यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले. अभिनय मुली गटात त्रिवेणी ठाकूर देसाई (देवल क्लब) हिला प्रथम, अर्णवी अराटे (गडहिंग्लज कला अकादमी) द्वितीय आणि वेदिका पोतदार (आजरा हायस्कूल) हिला तृतीय क्रमांक मिळाला. तर यशश्री परमाज (वडगाव), लीजा वालेकर (कोल्हापूर), योगिता वाघमोडे (इचलकरंजी), रुद्राक्ष हिरेमठ (कोल्हापूर) आणि वेदिका रुईकर (मिरज) यांना उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला.

----
तांत्रिक विभागातील पारितोषिके
अनुक्रमे पार्श्वसंगीत- ऋषिकेश देशमाने (गडहिंग्लज कला अकादमी), देवास जोशी (इंद्रधनु मिरज), प्रकाश योजना - अर्जुन पिसाळ ( देवल क्लब ), रोहन घोरपडे (गडहिंग्लज कला अकादमी), नेपथ्य - संजय हळदीकर (देवल क्लब कोल्हापूर), तानाजी पाटील (आजरा हायस्कूल), रंगभूषा - अवधूत सावंत (देवल क्लब कोल्हापूर), जी. डी. कांबळे (आजरा हायस्कूल), वेशभूषा - अशोक महाजन (आदर्श हायस्कूल गवसे), स्वराज पाटील (ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठवडगाव).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Isro News : चंद्र अन् अंतराळात भारताची छाप! अंतरिक्ष स्टेशनचे स्वप्न आले जवळ; इस्रोची दोन नवीन स्पेडेक्स मोहिमा जाहीर

बिग बॉसच्या घरात तुला भाऊ मानणारे लग्नाला का नाही आले? सुरज चव्हाणने मारली पलटी; म्हणतो- आता ते लोक...

World Tuberculosis Day 2026: पाठदुखी फक्त पोस्चरमुळे नाही; कधी स्पायनल टीबीही असू शकतो कारण ! 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नका

Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

IPL 2026 New Rule : १५ नवीन नियम... BCCIने खेळाडू, त्यांचे कुटुंबिय अन् फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली; चुका केल्यास कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT