कोल्हापूर

परशुराम शोभायात्रा

CD

08644

इचलकरंजीत परशुराम जन्मोत्सवदिनी शोभायात्रा
ब्राह्मण सभेतर्फे आयोजन; अभिषेक, महाप्रसादासह विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता. ११ : ब्राह्मण सभा इचलकरंजी यांच्यावतीने परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्मोत्सवानिमित्ताने ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांमार्फत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्राह्मण समाजातील बालचमूंनी वेगवेगळ्या देशभक्त, क्रांतिकारकांची तसेच ऐतिहासिक महापुरुषांची वेशभूषा केली होती. यामुळे शोभायात्रेची शोभा वाढली.
सकाळच्या सत्रात पूजा व पवमान अभिषेक सोहळा धाकटा वाडा येथे वेदशास्र ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात झाला. सायंकाळी भव्य शोभा यात्रेचे उद्घाटन गावभाग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय भागवत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. पारंपरिक आणि घरगुती पद्धतीने परशुराम जन्मोत्सवाचा सोहळा झाला. ब्राह्मण सभा व ब्राह्मण समाज नेहमीच सर्व समाजातील विविध जयंती, पुण्यतिथीनिमित्त नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो. ब्राह्मण सभेच्या या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे गौरवोद्गार श्री. गोडसे यांनी काढले. घोडे, बँड पथकाचा भक्तिमय ताल, परशुराम गीत, आवेषपूर्ण घोषणा,अशा पारंपरिक पद्धतीने भव्य दिव्य शोभायात्रा निघाली. समाजातील आबालवृद्धांसह तरुण -तरुणाई ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेची सुरुवात झेंडा चौकापासून करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यावरुन मार्गक्रमण करीत सांगता श्रीराम मंदिर गावभाग येथे करण्यात आली. श्रीराम मंदिरात देवाचा पाळणा, आरती करण्यात आली. महिलांसाठी हळदी-कुंकू तसेच कैरीच्या पन्ह्यासह सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT