कोल्हापूर

खून सहा अटक

CD

08669
इचलकरंजी : खुनी हल्ल्यानंतर घटनास्थळी दुचाकी गाड्यांची अज्ञातांनी तोडफोड केली
...
खूनप्रकरणी सहा जणांना अटक
पंधरा जणांवर गुन्हा दाखल : इचलकरंजीत खुनी हल्ल्यानंतर दुचाकींची तोडफोड
इचलकरंजी, ता. १३ : यंत्रमाग कामगार राकेश कांबळे (वय २६) याच्या खूनप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारासह सुमारे पंधरा जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद राहुल धर्मा कांबळे यांनी पोलिसांत दिली. पसार झालेल्या या टोळक्यातील सहा जणांना शिवाजीनगर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.
सूरज आनंदा कौदाडे (वय २७, रा. शहापूर), ओंकार दत्तात्रय खोत (वय २६, रा. भारतमाता हौसिंग सोसायटी इचलकरंजी), ऋषिकेश श्रीकांत सांळुखे (वय २५, इचलकरंजी), प्रतीक दीपक खोत (वय ३५, रा. शाहूनगर, हातकणंगले), संदेश ऊर्फ स्वप्नील बाजीराव जाधव (वय २३, रा. भारतमाता हौसिंग सोसायटी, इचलकरंजी), राकेश रामा कोरवी (वय २६, रा. मुळीक गल्ली, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत.
काही संशयितांना सीसीटीव्हीच्या फुटेजवरून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. कांबळे याचा खून तत्कालीन भांडणाच्या कारणावरून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
रविवारी (ता. १२) रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास पंचगंगा सहकारी साखर कारखान्यानजीक अष्टविनायकनगर येथील गाडी अड्डा मैदानात कांबळे याच्यावर सशस्त्र हल्ला करत निर्घृण खून करण्यात आला. अटकेतील प्रतीक खोत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पंचगंगा कारखाना परिसरातील चायनीज गाड्यावर रविवारी रात्री रोहन भोसले, वैभव मिरजे याच्यासह पाच जण खाद्यपदार्थ खात बसले होते. त्यांच्यात चेष्टामस्करी सुरू झाली. यातून त्यांच्यात वाद उफाळत हाणामारी झाली. यावेळी दोन्ही बाजूंचे गट घटनास्थळी आले. यावेळी काहीजण पसार झाले. मात्र, राकेश हा हल्लेखोरांच्या तावडीत सापडला. त्याला बेदम मारहाण सुरू झाली. जीवाच्या आकांताने तो वाट मिळेल तिकडे पळू लागला. मात्र, गाडी अड्डा मैदानात पाठलाग करून त्याला गाठले आणि टोळक्याने त्याच्या पाठीत, पोटावर शस्त्राने वार केले.
...
वाहनांची तोडफोड; घरावर दगडफेक
राकेश कांबळे याचा खून झाल्याचे समजताच काहींनी घटनास्थळी दोन गाड्यांची तोडफोड केली. त्यानंतर संतप्त जमावाने भागातील एका कुलूपबंद घरावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मोठे तणावाचे वातावरण बनले होते. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT