कोल्हापूर

फसवणूक

CD

नव्याऐवजी दिली चिरमुऱ्याची जुनीच मशीन
पाच लाखांची फसवणूक; बेळगावच्या एकावर गुन्‍हा दाखल

इचलकरंजी, ता. १५ : नव्याऐवजी चिरमुऱ्याची व रोस्टरची जुनी मशीन देत बेळगाव येथील एकाने संतोष दत्तात्रय कोळी ऊर्फ बाळ महाराज (वय ४०) यांची फसवणूक केल्याची घटना घडली. सुमारे ५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नईम मुजावर (रा. खानापूर रोड, बेळगाव) याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फिर्यादी कोळी यांनी संशयित मुजावर याला नवीन चिरमुरे व रोस्टर मशीन खरेदीसाठी पाच लाख रुपये दिले होते.
कोरोची (ता. हातकणंगले) येथील गट नंबर ६०० याठिकाणी संतोष कोळी यांना नवीन प्रकारची चिरमुरे व रोस्टर मशीन खरेदी करून उद्योग सुरू करायचा होता. यासाठी कोळी यांनी बेळगाव येथील मशीन उपलब्ध करून देणाऱ्या नईम मुजावर यांच्याशी संपर्क साधला. नवीन प्रकारची चिरमुरे व रोस्टर मशीन खरेदीसाठी एकूण ३५ लाख रुपये लागणार होते. त्यासाठी सुरुवातीला ५ लाख रुपये दिले. त्यानंतर मुजावर यांनी दोन्ही मशीन कोळी यांच्याकडे दिलेल्या पत्त्यावर पाठवून दिले. मात्र, यावेळी दोन्ही मशीन जुन्याच असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याच्याकडे नवीन मशीनची मागणी केली असता, मुजावर याने नवीन मशीन आणि घेतलेले पैसेही परत दिले नाहीत. त्यानुसार कोळी यांच्या फिर्यादीनुसार ५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी मुजावर याच्यावर गुन्हा दाखल केला.

चौकट
तक्रार जुनी; गुन्हा आता दाखल
आर्थिक फसवणूक झाल्याबाबतची तक्रार कोळी यांनी सहा महिन्यांपूर्वी शहापूर पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कोळी यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली. त्यानंतर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या तक्रार अर्जावर कार्यवाही करण्यास विलंब करणारे पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांच्याविरोधात तक्रार झाल्याने हा तपास पोलिस उपनिरीक्षक साबळे यांच्याकडे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

SCROLL FOR NEXT